शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रभावी नियोजनामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ

By admin | Updated: August 1, 2015 01:21 IST

विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तनबदल घडवून आणण्याकरिता शिक्षकांनी स्वत: विकसित असणे गरजेचे आहे.

गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तनबदल घडवून आणण्याकरिता शिक्षकांनी स्वत: विकसित असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नियोजन आवश्यक आहे. प्रभावी व परिणामकारक नियोजनच शैक्षणिक गुणवत्तेला पुढे आणते, गुणवत्तेत वाढ होते, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी केले. पंचायत समिती अंतर्गत मुरखळा केंद्राचे पहिले केंद्र संमेलन संजीवनी उच्च प्राथमिक शाळा नवेगाव येथे गुरूवारी घेण्यात आले. यावेळी डांगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. डी. सोनटक्के होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, संजीवनी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पोरेड्डीवार, वेणुगोपाल ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एकनाथ श्रीकोंडावार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेंदरे यांनी पुस्तक परिचय करून दिला. दडमल यांनी इयत्ता दुसरीच्या विषयाचा पाठ घेतला. कल्पना आकनुरवार यांनी अभ्यासाचे नियोजन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, प्रकल्प नियोजन व अंमलबजावणी यावर चर्चा घडवून आणली. रत्तो हिचामी यांनी लेखांचे वाचन केले. गौतम मेश्राम यांनी चर्चात्मक मार्गदर्शन केले. दरम्यान उद्धव डांगे, पुलखलच्या मुख्याध्यापिका कुंभारे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रवीण एडलावार तर आभार रूपा शृंगारपवार यांनी मानले. यावेळी ७३ शिक्षक हजर होते. (शहर प्रतिनिधी)