शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

पैसे काढण्यासाठी जिल्हाभरातील बँकांमध्ये वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना बेरोजगारीची झळ सहन करावी लागली. या नागरिकांना दिलासा म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जनधन खात्यामध्ये ५०० रुपये टाकण्यात आले. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे गॅस सिलिंडर कनेक्शन आहेत,

ठळक मुद्देवृद्ध व शेतकऱ्यांची संख्या अधिक : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत नागरिकांच्या खात्यांमध्ये पैसे टाकण्यास सुरूवात झाली आहे. सदर पैसे काढण्यासाठी जिल्हाभरातील बँकांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी सोमवारी गर्दी केली होती.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना बेरोजगारीची झळ सहन करावी लागली. या नागरिकांना दिलासा म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जनधन खात्यामध्ये ५०० रुपये टाकण्यात आले. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे गॅस सिलिंडर कनेक्शन आहेत, अशा नागरिकांच्या बँक खात्यामध्ये ७९० रुपये टाकले जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचे अनुदानही जमा करण्यात आले आहे. तसेच निराधार व्यक्तींच्या खात्यांमध्येही प्राधान्याने १ हजार रुपये जमा केले जात आहेत. सदर पैसे काढण्यासाठी सोमवारी गडचिरोली शहरातील विविध बँका तसेच जिल्हाभरातील इतरही बँकांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.गर्दीमुळे काही बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन केले जात होते. मात्र बँकेने सावलीची केलेली व्यवस्था अपुरी पडत असल्याने नागरिकांना सावलीचा आधार घेऊन सावलीतच गर्दी करून राहावे लागत होते. बँकेच्या कार्यालयात मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.बँक मित्रामुळे गर्दी कमी होण्यास मदतज्या नागरिकांचे बँक खाते आधारशी संलग्नित आहेत. तसेच त्यांना २० हजार पेक्षा कमी रक्कम काढायची असेल तर अशा ग्राहकांसाठी बँक आॅफ इंडिया गडचिरोली येथे बँक मित्राची नियुक्ती केली आहे. त्यामुळे बँकेतील गर्दी कमी होण्यास मदत झाली. विड्रॉलचा अर्ज करून थंब घेतल्यानंतर पैसे दिले जात होते. मात्र काही ग्राहकांची बँक खाती आधारशी संलग्नित नसल्याने अशा नागरिकांना बँकेतच जाऊन पैसे काढावे लागत होते.

टॅग्स :bankबँक