शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदीसाठी लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:52 IST

खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला १५ दिवसांत सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे.

ठळक मुद्देधानाचे विविध वाण उपलब्ध : खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांना वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला १५ दिवसांत सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे.जिल्ह्यात जवळपास १० जूनपर्यंत पावसाचे आगमन होते. जोरदार पाऊस झाल्यानंतर लगेच शेतीच्या मशागतीला सुरूवात होते. वेळेवर बियाणे खरेदीसाठी वेळ मिळत नसल्याने शेतकºयांनी आतापासूनच त्यांना लागणारे बियाणे खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील कृषी केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची लगबग वाढली असल्याचे दिसून येते.गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक धानपिकांचेच उत्पादन घेतले जाते. सिंचनाची सुविधा उपलब्धतेनुसार शेतकरी जड किंवा हलक्या धानाची लागवड करतात. यावर्षी बाजारात धानाचे १३-१२, जयश्रीराम, जोरदार, आरपीएन, बलवान, शबरी, ओम-३, क्रांती, श्रीकृष्ण आदी वान उपलब्ध आहेत. एका किलोसाठी १० किलो बियाणे लागतात. त्यामुळे १० किलोची एक बॅग बियाणे निर्मिती कंपन्या तयार करतात. १० किलो बॅगसाठी ५०० ते ६६० रूपये भाव आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणांच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही, अशी माहिती कृषी केंद्र चालक यांनी दिली आहे.दिवसेंदिवस शेतकरी संकरीत बियाणांचा वापर अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.