शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

नादुरूस्त ट्रॅक्टरने केला रस्ता जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:28 IST

रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत चालण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले.

ठळक मुद्देवडसाच्या रेल्वे भूमिगत पुलावरील प्रकार : दूरदृष्टीकोनाअभावी सदर मार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी

आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत चालण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले. मात्र या ठिकाणी अतिशय अरूंद स्वरूपाचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे येथील दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शहरवासीयांना आला.लाखांदूर मार्गावरून काळी राख घेऊन येणारा ट्रॅक्टर ऐन भूमिगत पुलाच्या शेवटच्या टोकावर नादुरूस्त झाल्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली. परिणामी अनेक वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले.देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली असून रेल्वेच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील भागाच्या मधोमधून रेल्वे मार्ग गेला असल्याने दोन्ही भागांना जोडणारा हा भूयारी मार्ग नव्याने सुरू झालेला आहे. जड वाहने याच भूयारी मार्गाने आवागमन करीत आहेत. वारंवार बंद होणाºया रेल्वे फाटकावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने देसाईगंज येथे भूमिगत पुलाचे बांधकाम केले. मात्र रेल्वे प्रशासन तथा स्थानिक प्रशासनाने बांधकामाच्या बाबतीत भविष्याचा विचार केला नाही. तसेच याबाबत कोणताही दुरदृष्टीकोन बाळगला नाही. परिणामी क्षुल्लक कारणामुळे या मार्गावर अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूमधून एकावेळी केवळ एकच वाहन काढता येते. त्यामुळे एखादे वाहन या ठिकाणी नादुरूस्त झाल्यास इतर वाहनधारकांची तारांबळ उडत असते. याचा प्रयत्य देसाईगंज शहरवासीयांना नेहमीच येत आहे. विशेष म्हणजे सकाळी १० वाजता असा प्रकार घडल्याने वाहनधारकांना मार्ग खुला होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.राख घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलाच्या शेवटच्या टोकावर नादुरूस्त झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक पुर्णत: ठप्प पडली. सदर प्रकार यापुढे होऊ नये, याकरिता रेल्वे व स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.