शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रशिक्षणार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: September 2, 2014 23:44 IST

आदिवासी विकास विभाग व राज्य परिवहन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे आदिवासी प्रशिक्षण केंद्र १९९६ पासून सुरू आहे. मात्र २५ प्रशिक्षणार्थ्यांना राहण्याची सोय एसटीच्या अधिकाऱ्यांनी

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग व राज्य परिवहन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे आदिवासी प्रशिक्षण केंद्र १९९६ पासून सुरू आहे. मात्र २५ प्रशिक्षणार्थ्यांना राहण्याची सोय एसटीच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून न दिल्याने प्रशिक्षणाची पहिलीच १ सप्टेंबरची रात्र उघड्यावर झोपून काढावी लागली. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रशिक्षणार्थ्यांकडून होत आहे. एसटीमधील अनुसूचित जमातींचा अनुशेष भरून निघावा, त्याचबरोबर आदिवासी युवकांना रोजगाराचे साधन उलपब्ध व्हावे यासाठी राज्य परिवहन महामंडळ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या प्रशिक्षण केंद्रात २५ आदिवासी युवकांनी प्रवेश घेतला असून त्यांचे प्रशिक्षण १ सप्टेंबरपासून सुरूवात झाले. प्रशिक्षणचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग उचलत असून तो पैसा राज्य परिवहन महामंडळाकडे वळता केला जातो. प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जात असून प्रशिक्षणानंतर त्यांना वाहन चालविण्याचा परवाना व बॅच नंबर दिला जातो. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या युवकाला पुढे एसटी विभागामध्ये सामावून घेतल्या जाते. प्रशिक्षणार्थीच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे. दिवसभर एसटी चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थी यापूर्वीचे प्रशिक्षणार्थी राहत असलेल्या निवासस्थानामध्ये झोपण्यासाठी गेले. मात्र एसटीच्या अधिकाऱ्यांनी सदर निवासस्थानामध्ये झोपण्यास मज्जाव केला. त्यांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास सांगितले. मात्र या ठिकाणी विद्युत, शौचालय, पाण्याची व्यवस्था नाही. त्याचबरोबर खिडक्यांना तावदान लावण्यात आले नसल्याने त्या ठिकाणी झोपणे अशक्य झाले. त्यामुळे सर्वच प्रशिक्षणार्थ्यांनी आगाराच्या परिसरात रात्र जागुन काढली. ही बाब जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना माहित होताच संबंधित एसटीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयाचा निधी प्राधान्याने प्राप्त करून दिला जातो. यातून शेकडो योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने आदिवासी नागरिक व युवकांना स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतही विकासाची फळे चाखता आला नाही. सदर प्रशिक्षण केंद्रासाठी लागणारा संपूर्ण निधी आदिवासी विकास विभाग उलपब्ध करून देतो. फक्त त्याची अंमलबजावणी करण्याचे कामे एसटी प्रशासनाचे आहे. मात्र एसटी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पहिलीच रात्र उघड्यावर काढावी लागली. यामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)