शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

गैरसोयीवरून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात हंगामा

By admin | Updated: December 2, 2015 01:28 IST

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या कायम असून येथील आरोग्यसेवा कोलमडली आहे. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे.

एटापल्ली : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या कायम असून येथील आरोग्यसेवा कोलमडली आहे. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे. या सर्व मुद्यांवरून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात रुग्ण व नातेवाईकांनी जोरदार हंगामा केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सोमवारला रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. रुग्ण व नातेवाईकांचा जमाव वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद आकिनवार यांच्या निवासस्थानाकडे पोहोचताच डॉ. आकिनवार यांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांकडे या घटनेची तोंडी तक्रार केली. गेल्या अनेक दिवसांपासून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णांच्या वॉर्डातील दिवे व पंखे बंद आहेत. रुग्णांना योग्य व पुरेसा औषधोपचार पुरविल्या जात नाही. एकूणच या रुग्णालयाची आरोग्यसेवा पूर्णत: कोलमडली आहे. या सर्व मुद्यांवरून एटापल्ली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रमेश गंपावार, काँग्रेसचे पदाधिकारी मनोहर हिचामी, तेलकुंटवार रुग्णालयात आले. १५ ते २० नागरिकांसमवेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिकांना रुग्णालयातील समस्यांबाबत जाब विचारला. लहान मुलासोबत असलेल्या एका महिला रुग्णाला बेड का दिला नाही, अशी विचारणाही त्यांनी अधिपरिचारिकांकडे केली. त्यानंतर पदाधिकारी व रुग्णांनी आक्रमक पवित्रा घेऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकिनवार यांना रुग्णालयात बोलाविण्यास सांगितले. त्यानंतर येथील आरोग्य कर्मचारी डॉ. आकिनवार यांना बोलविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे गेले. दरम्यान डॉ. आकिनवार यांनी रुग्णालयात येण्यास स्पष्ट नकार दिला. डॉक्टरांची अशी बेजबाबदारपणाची वागणूक पाहून नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा एटापल्ली पं. स. चे सभापती दीपक फुलसंगे यांना रुग्णालयस्थळी बोलाविले. त्यानंतर पदाधिकारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जमाव डॉ. आकिनवार यांच्या निवासस्थानाकडे पोहोचला. जमाव पोहोचला असल्याचे पाहून तत्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकिनवार यांनी भ्रमणध्वनीवरून एटापल्लीचे ठाणेदार सुहास आव्हाड यांच्याकडे अराजकतत्त्वाचे लोक माझ्याकडे आले असल्याची तक्रार केली. (तालुका प्रतिनिधी)