शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बदक पालनासाठी मिळणार प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:55 IST

शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून बदक पैदास केंद्र दिले जाणार आहेत. बदक पालन करून शेती व्यवसायास जोड म्हणून अर्थिक उत्स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी वडसा येथील बदक पैदास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संगीता निरगुडकर यांनी केले.

ठळक मुद्देगेवर्धात शेतकऱ्यांना प्रशिक्षण : लाभ घेण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून बदक पैदास केंद्र दिले जाणार आहेत. बदक पालन करून शेती व्यवसायास जोड म्हणून अर्थिक उत्स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी वडसा येथील बदक पैदास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संगीता निरगुडकर यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गेवर्धा येथे शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. विक्रम कदम, कृषी अधिकारी किशोर सरदारे, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, कृषी पर्यवेक्षक व्ही. जी. मसराम, कृषी सहायक जी. के. जल्लेवार, कृषी मित्र योगेश नखाते, गेवर्धाचे सरपंच टिकाराम कोलेटी, उपसरपंच संदीप नखाते, पोलीस पाटील भाग्यरेखा वहतले आदी मान्यवर उपस्थित होते.जनावरांचे कृत्रिम रेतन करून जातीवंत पशुधनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करून घेतले पाहिजे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. निरगुडकर यांनी केले.संदीप कºहाडे यांनी सेंद्रीय भाजीपाला व सेंद्रीय शेतमालाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे शेतकºयांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन केले. तसेच सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश पवार यांनी भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, आळंबी उत्पादन, व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी जनावरांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने चारा लागवड करण्याचे आवाहन यावेळी केले. कृषी पर्यवेक्षक मसराम यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार किशोर सरदारे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.