शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 01:40 IST

विज्ञानामुळे विकास झपाट्याने होत आहे. मात्र विज्ञानाचा वापर माणसावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनी कायम वैज्ञानिक

अशोक नेते यांचे आवाहन : विद्यार्थी, शिक्षकांनो; वैज्ञानिक दृष्टिकोन कायम बाळगागडचिरोली : विज्ञानामुळे विकास झपाट्याने होत आहे. मात्र विज्ञानाचा वापर माणसावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनी कायम वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून जिल्हा विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने समावेशीत विकासासाठी विज्ञान व गणित या मुख्य विषयावर आधारित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन सोमवारी थाटात झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून खासदार नेते बोलत होते. १५६ पैकी ११० प्रतिकृती सादर४तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीतून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी एकूण १५६ प्रतिकृतींची निवड करण्यात आली. यापैकी सोमवारला पहिल्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत केवळ ११० प्रतिकृतींची नोंदणी करण्यात आली व ११० प्रतिकृती प्रत्यक्षात सादर करण्यात आल्या. उर्वरित प्रतिकृती मंगळवारला सादर होतील, अशी माहिती आहे.४गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी केतन देशमुख यांनी विज्ञान शिक्षक नरेंद्र उंदीरवाडे यांच्या मार्गदर्शनात ‘अ‍ॅन्टीथेट मोबाईल डायलर’ प्रतिकृती सादर केली. या प्रतिकृतीत सदर विद्यार्थ्याने दुचाकीच्या स्टँडच्या बाजुला एक भ्रमणध्वनी संच ठेवला. सदर दुचाकी कुणीही स्टँडवरून काढून इतरत्र नेण्याचा तसेच लंपास करण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या मोबाईलवर दुचाकी स्टँडलगत असलेल्या मोबाईलवरून स्वयंचलित फोन जातो. त्यामुळे दुचाकी लंपास होत असल्याचे तत्काळ निदर्शनास येते. दुचाकी चोरीवर आळा घालण्याच्या हेतूने तयार केलेल्या या नवख्या प्रतिकृतींचे खासदार, आमदारांसह साऱ्याच मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले.