शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

जिल्हास्तरीय बालक्रीडा स्पर्धांचे उद्घाटन थाटात

By admin | Updated: February 12, 2015 01:04 IST

जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जि. प. च्या प्रांगणात गुरूवारी जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा तसेच पदाधिकारी, अधिकारी, ...

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जि. प. च्या प्रांगणात गुरूवारी जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा तसेच पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे तर अध्यक्षस्थानी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. विशेष अतिथी म्हणून जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य वर्षा कौशिक, पद्माकर मानकर, शांता परसे, विजया विठ्ठलानी सुकमा जांगधुर्वे, धर्मप्रकाश कुकुडकार, धानोरा पं. स. च्या सभापती कल्पना वड्डे, आरमोरीच्या पं. स. सभापती सविता भोयर, पं. स. सदस्य करंगामी, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राऊत, निरंतर शिक्षणाधिकारी पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंभार आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर क्रीडाध्वज फडकवून व क्रीडा मशाल पेटवून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, जि. प. सदस्य पद्माकर मानकर यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील आठ प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, संचालन केंद्रप्रमुख गौतम मेश्राम व पदवीधर प्राथमिक शिक्षिका अर्पणा बेद्रे यांनी केले. आभार केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार, यांनी मानले.जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठी गडचिरोली येथे बाराही तालुक्यातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे कबड्डी, खो-खो खेळाच्या संघातील खेळाडू दाखल झाले आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्यालयाच्या महिला व पुरूष कर्मचारी खेळाडू संघानेही सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून विद्यार्थी व कर्मचारी खेळाडू उपस्थित झाल्याने जिल्हा परिषद परिसर फुलले होते. (स्थानिक प्रतिनिधी)या आदर्श शिक्षकांचा झाला गौरवजिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील आठ शिक्षकांची निवड करण्यात आली. या आठही शिक्षकांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मानित करण्यात आले. यामध्ये विलास नक्टूजी भांडेकर, जि. प. प्राथमिक शाळा वसा (गडचिरोली), गोपीनाथ तुकाराम नेवारे, जि. प. प्राथमिक शाळा आरमोरी, सुनंदा बाबुराव पारटवार, जि. प. प्राथमिक शाळा, आमगाव (देसाईगंज), पुरंदर रामचंद्र चौधरी, जि. प. प्राथमिक शाळा सावलखेडा (कुरखेडा), वासुदेव आत्माराम कुनघाडकर, जि. प. प्राथमिक शाळा पेटतळा (चामोर्शी), अनिल शंकर मार्तीवार, जि. प. प्राथमिक शाळा कांचनपूर (मुलचेरा), रमेश पांडुरंग कुसनाके, जि. प. प्राथमिक शाळा वेलगुर (अहेरी), लालदेव फकीरा कोडापे, जि. प. प्राथमिक शाळा धोडराज (भामरागड) आदींचा समावेश आहे.