शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातून रक्कम गहाळ करणाऱ्या महिलेस कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:21 IST

एटीएम कार्ड मिळविण्याच्या फार्मवर स्वाक्षरी घेऊन तसेच बनावट स्वाक्षरी करून बँकेतून एटीएम कार्ड प्राप्त करीत ६ हजार ६०० रूपयांची रक्कम परस्पर काढणाऱ्या महिलेला गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने २३ जुलैैला साधा कारावास व ८ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देतीन वर्षाची शिक्षा : कोर्टाने आठ हजारांचा ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटीएम कार्ड मिळविण्याच्या फार्मवर स्वाक्षरी घेऊन तसेच बनावट स्वाक्षरी करून बँकेतून एटीएम कार्ड प्राप्त करीत ६ हजार ६०० रूपयांची रक्कम परस्पर काढणाऱ्या महिलेला गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने २३ जुलैैला साधा कारावास व ८ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.रोशनी अशोक लेमाडे (२४) रा. देगाव ता. रिसोड जि. वाशिम हल्ली मुक्काम गडचिरोली असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. रोशनी लेमाडे हिने गडचिरोलीच्या कॅम्प एरियातील भारती धर्मदास गायकवाड यांचे खाते असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून त्यांना कुठलीही माहिती न देता लबाडीने एटीएम कार्ड मिळविण्याच्या फार्मवर स्वाक्षरी घेऊन तसेच फिर्यादीची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून एटीएम कार्ड प्राप्त केले. त्याद्वारे ६ हजार ६०० रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन फसवणूक केली, अशी तक्रार फिर्यादीने गडचिरोली पोलीस ठाण्यात १६ मार्च २०१३ रोजी केली. या तक्रारीवरून कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४६७ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. २३ जुलै २०१९ रोजी आरोपीविरूद्ध सबळ पुरावे असल्याचे निष्पन्न असल्याने गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी रोशनी लेमाडे यांना कलम ४१९ अन्वये एक वर्ष साधा कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा, कलम ४२० अन्वये दोन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी १५ दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा, ४६८ अन्वये ३ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व ३ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा, कलम ४७१ अन्वये ३ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व ३ हजार रूपयांची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास १ महिन्याची साध्या कारावाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सरपे यांनी काम पाहिले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCourtन्यायालय