शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार करणाऱ्यास कारावास

By admin | Updated: June 18, 2017 01:14 IST

घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीस आपल्या दुकानात बोलावून लैंगिक कृत्य करणाऱ्या आरोपीस

दंड : जिल्हा न्यायालयाचा निकाल लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीस आपल्या दुकानात बोलावून लैंगिक कृत्य करणाऱ्या आरोपीस गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश यु. एम. पदवाड यांनी दहा वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राहुल राजकुमार शिंगाडे (२१) रा. आष्टी ता. चामोर्शी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे फिर्यादीच्या सासऱ्याच्या चाळीमध्ये चप्पलचे दुकान आहे. फिर्यादीच्या मुलीची आरोपी राहुल शिंगाडे याच्याशी ओळख झाली. यामुळे ती नेहमी मामा म्हणून त्याच्याकडे येत - जात होती. ६ नोव्हेंबर २०१४ रोजी आरोपीने पीडित मुलीला ती आपल्या घरासमोर खेळत असताना दुकानात बोलाविले. यावेळी तिच्यासोबत जबरी व लैंगिक कृत्य केले. याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले. पीडित मुलीच्या वडीलांनी मुलचेरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) भादंवी सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला १३ डिसेंबर २०१४ रोजी अटक केली. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र केले. न्यायालयाने साक्षीदारांचे बयाण नोंदविल्यानंतर सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून १७ जून रोजी आरोपीस दहा वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक खांदलकर यांनी काम बघितले.