शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

छेडखानी करणाऱ्या युवकास कारावास

By admin | Updated: April 21, 2017 01:06 IST

घरी झोपलेल्या वयस्क महिलेची छेडखानी करणाऱ्या युवकास येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांचा कारावा

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल : दोन वर्षांची शिक्षा व दीड हजारांचा दंडगडचिरोली : घरी झोपलेल्या वयस्क महिलेची छेडखानी करणाऱ्या युवकास येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांचा कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रखनसिंह हॉटेलसिंह डांगी(२८) रा.मारकबोडी, ता.गडचिरोली असे शिक्षा झालेल्या दोषी युवकाचे नाव आहे.८ एप्रिल २०१६ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ५० वर्षीय पीडित महिला घरी एकटीच झोपून असताना तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. सासू आल्याचे समजून ती पुन्हा झोपी गेली. मात्र, गावातीलच रखनसिंह डांगी हा युवक दारुच्या नशेत घरात आल्याचे समजताच पीडित महिलेने त्यास निघून जाण्यास सांगितले. मात्र, रखनसिंहने तिचे दोन्ही हात पकडून तिचा विनयभंग केला. महिलेने कशीबशी आपली सुटका करुन शेजारच्या महिलांना बोलावून आणले. यावेळी रखनसिंह हा शेजारच्या एका महिलेच्या घरी गेला होता. त्यानंतर पीडित महिलेने मुलीशी संपर्क करण्यासाठी मोबाईल बघितला असता, तोही आढळला नाही. यावरुन मोबाईलदेखील रखनसिंहनेच चोरुन नेल्याची खात्री पटताच पीडित महिलेने त्यास आवाज दिला. परंतु त्याने तिला अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिस पाटलाने गडचिरोली पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी रखनसिंह डांगी याच्यावर भादंवि कलम ३५४, २९४, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अनंत कांबळे यांनी आरोपी रखनसिंह डांगी यास अटक करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.गुरूवारी या प्रकरणाचा निकाल लागला. साक्षीदारांचा पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मुख्य न्यायदंडाधिकारी रोहन रेहपाडे यांनी आरोपी रखनसिंह डांगी यास दोन वर्षांचा कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एल. एस. गजभिये यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयेश खंदरकर, शिपाई रेशमा गेडाम, सुभाष सोरते, पवन येवतकर यांनी जबाबदारी सांभाळली. (स्थानिक प्रतिनिधी)