शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोटपा कायद्याची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:59 IST

तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोटपा कायदा केला आहे. या कायद्याची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिनाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अँकर । पालकमंत्र्यांचे निर्देश; जिल्हा सामान्य रूग्णालयात तंबाखू नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोटपा कायदा केला आहे. या कायद्याची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. भागराज धुर्वे, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे, जिल्हा न्यायाधीश पाटील, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढले आहे. तंबाखूच्या व्यसनामुळे नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत. मुक्तीपथच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखूविरोधी जनजागृती केली जात आहे. मुक्तीपथच्या या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. संचालन डॉ. नंदू मेश्राम तर आभार डॉ. माधुरी किलनाके यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्नेहल संतोषवार, महेश देशमुख, निलेश सुबेदार, दिनेश खोरगडे, मिना दिवटे, राहूल कंकनालवार, गोपाल पेंदाम, सिमा बिश्वास, प्रणाली ठेंगणे, रिना मेश्राम यांच्यासह जिल्हा सामान्य रूग्णालयात इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.जनजागृतीवर भर द्या -आ. कृष्णा गजबेपथनाट्य, रॅली आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली पाहिजे. तंबाखूला दूर करण्याकरिता स्वत:च्या मनाचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तंबाखू नियंत्रणासाठी शासनाने केलेल्या कोटपा कायद्याची अंमलबजावणी केली जावी. जे या कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही आमदारांनी दिले.रूग्णालयात मॉड्युलर लेबर रूममहिला व बाल रूग्णालयात सीएसएसडी, मॉड्युलर लेबर रूम आणि अ‍ॅडव्हॉन्स स्किल लॅब फॉर बर्थ अटेंडन्सचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी महिला व बाल रूग्णालयाच्या स्थितीचा आढावा जाणून घेतला. तंबाखू नकार दिनाचे औचित्य साधून महिला व बाल रूग्णालयातून रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत नारे देण्यात आले. यामध्ये आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :ministerमंत्री