शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

झटपट श्रीमंत हाेण्याचा रेती तस्करीचा गाेरखधंदा जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

चामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती खनन केले जात आहे. झटपट ...

चामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती खनन केले जात आहे. झटपट बक्कळ पैसा कमावून श्रीमंत हाेण्याचा अवैध धंदा सध्या चामाेर्शी तालुक्यात जाेमात सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.

चामाेर्शी तालुक्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गणपूर, दाेटकुली, बाेरघाट, जयरामपूर, वाघाेली, माेहाेर्ली, तळाेधी माेकासा, कुरूळ आदी गावातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे विविध बांधकामांसाठी रेती चाेरुन विक्री करण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. झटपट श्रीमंत हाेण्यासाठी काही व्यावसायिक माेठ्याप्रमाणावर रेतीची चाेरी रात्रीच्या सुमारास करुन त्याची विक्री करीत आहेत. परिणामी शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. गडचिराेली जिल्ह्यात २५ रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया प्रस्तावित हाेती. परंतु यातील १० घाटांचा लिलाव झाला. मात्र तेथेसुद्धा अद्यापही प्रत्यक्ष रेती खननाला सुरूवात झाली नाही. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे चामाेर्शी तालुक्यात रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. वैनगंगा नदीघाटावरुन सुरू असलेल्या रेती तस्करीची उच्चस्तरीय चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करावी. तसेच रेली घाटांचे लिलाव करुन सामान्य जनतेला वाजवी दरात रेली उपलब्ध करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

रेती तस्करीत अदृश्य हात?

चामाेर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील घाटांचे लिलाव न झाल्याने रात्रीच्या सुमारास रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. परंतु या प्रकारात अनेकांचे अदृश्य हात असल्याची चर्चा आहे. रात्री रेतीचा उपसा करुन ढीग तयार करणे, नंतर महसूल प्रशासनाने ’ताे’ अवैध साठा जप्त करणे, अज्ञात व्यक्तीने रेती साठा करुन ठेवल्यामुळे ताे जप्त करुन लिलाव करणे. लिलाव प्रक्रियेत त्याच तस्करांनी भाग घेऊन साठा साेडविणे, असा गैरप्रकार सर्रास सुरू आहे, असे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बाेलले जात आहे. या सर्व अवैध प्रक्रियेत अदृश्य हात कुणाचे आहेत याचा शाेध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.