शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केलेल्या धानाची लवकर भरडाई करा- बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:19 IST

जिल्ह्यात एक लाख क्विंटल धान अजुनही खरेदी केंद्रांवर पडून आहेत. धान पावसात भिजून खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तत्काळ ज्या निश्चित केलेल्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून धानाची उचल करुन भरडाई करावी, .....

ठळक मुद्देभरडाई केंद्राची पाहणी : अन्न, नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात एक लाख क्विंटल धान अजुनही खरेदी केंद्रांवर पडून आहेत. धान पावसात भिजून खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तत्काळ ज्या निश्चित केलेल्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून धानाची उचल करुन भरडाई करावी, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी वडसा येथे अधिकाऱ्यांना दिले.आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. निश्चित केलेल्या एजन्सीकडून धानाची उचल व भरडाई केली जाते. जिल्ह्यातील अन्न धान्य वितरण व्यवस्थेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट वडसा येथे आले होते. दरम्यान त्यांनी वडसा येथील धान भरडाई केंद्रास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आयुक्त रमेश आडे, सचिव सुपे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, भरडाई मिल मालक श्रीचंद आकाश अग्रवाल, किसन नागदेवे उपस्थित होते.पुढे बोलतांना बापट म्हणाले की, भरडाई केलेले तांदुळ गोडावूनमध्ये व्यवस्थीत ठेवण्यात यावे व मागणीनुसार पुरवठादारांना लवकरात लवकर वितरीत करावे जेणेकरून गोडावूनच्या बाहेर ताडपत्री टाकून धान्य ठेवण्याची परिस्थिती उद्भवणार नाही. त्याच बरोबर शेजारील जिल्हा चंद्रपूर येथे त्यांच्या मागणीनुसार पुरवठा दारांना आमंत्रित करुन तांदूळ हस्तांतरीत करावे, अशाही सुचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी महामंडळाचे कर्मचारी हजर होते.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट