शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या प्रसिद्धीतूनच उजळेल गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:05 IST

या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अपेक्षा : ८० गावांत वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही. प्रसार माध्यमांनी केवळ वाईट गोष्टींवरच बोट न ठेवता चांगल्या कामांनाही प्रसिद्धी दिली पाहीजे. त्यातूनच जिल्ह्याची प्रतिमा उजळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली.भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बुधवानी यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्रेहमिलन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. येथील अलंकार टॉकीजमध्ये बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक टी.शेखर, १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, १९२ बटालियनचे कमांडंट मनोज कुमार, आणि आयोजक सलीम बुधवानी मंचावर विराजमान होते.यावेळी पालकमंत्री म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आज विकासाच्या प्रकाशापासून दूर आहेत. ८० गावांत अजूनही कित्येक वर्षात वीज पोहोचली नाही. अमडेली गावात मी वीज पोहोचविली. त्यावेळी तेथील लोकांच्या चेहºयावर दिसलेला आनंद मला आतापर्यंत वीज न पोहोचलेल्या सर्व गावकºयांच्या चेहºयावर पहायचा आहे. पण त्यासाठी अनेक अडचणी आहेत. अनेक परवानगींचे अडथळे पार करून ते काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राष्टÑीय एकात्मतेसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वक्त्यांनी बुधवानी यांचे कौतुक करून असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.‘ती’ बस होती केवळ चाचणीसाठीअमडेली गावात महिनाभरापूर्वी पहिल्यांचा एसटी बस घेऊन पालकमंत्री पोहोचले. परंतु नंतर ती बस गावात गेलीच नसल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. त्याबद्दल बोलताना पालकमंत्र्यांनी म्हणाले, ती बस नियमित फेरीसाठी नेली नव्हतीच. गावात बस जाऊ शकते का, याची चाचणी घेण्यासाठीच ती बस नेली होती. परंतु रस्ता दुरूस्त झाल्यानंतर ती बस नियमितपणे गावात जाईल. तो रस्ता दुरूस्त करण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले आहेत. निविदा प्रक्रिया आटोपून लवकरच हे काम सुरू होईल व नंतर बसफेरी सुरू केली जाईल, असे त्यांनी भाषणात सांगितले.