शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सागरोपवनातून मुरूमाचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:45 IST

आरमोरी तालुक्यातील कोकडी बिटातील साग रोपवनातून मुरूमाचे अवैधरित्या खणन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देकोकडी बिटामधील प्रकार : शासनाच्या लाखो रूपयांच्या महसुलावर फेरले जातेय पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील कोकडी बिटातील साग रोपवनातून मुरूमाचे अवैधरित्या खणन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.आरमोरी तालुक्यातील लोहारा-कोकडी मार्गावरील पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून धिम्या गतीने सुरू आहे. सदर पुलाच्या दोन्ही बाजुचा रस्त्यात भरण करण्यासाठी मुरूमाची आवश्यकता आहे. पुलालगत असलेल्या कोकडी येथील साग रोपवनातून जेसीबीच्या सहाय्याने खणन करून मुरूमाची दिवसा ढवळ्या वाहतूक केली जात आहे. जेसीबीने मुरूमाचे खणन करताना सागाचे मोठमोठे झाड उन्मळून मुरूम खोदलेल्या खड्ड्यातच बुजवून ते नष्ट केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे अवैध काम कंत्राटदारामार्फत सुरू असताना या प्रकरणाकडे संबंधित वनरक्षकाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाºयांनी साग रोपवनातून मुरूम खणनाची परवानगी देऊन आपले हात ओले करून घेतले का? अशी शंका निर्माण होत आहे.साग रोपवनात १५ ते २० फूट खोल खोदकाम करून मुरूम काढल्या जात असल्याने सागाच्या मोठ्या झाडाची मुळे खुले पडले आहेत तर काही तुटलेले आहेत. बरीच झाडे खड्ड्यात टाकण्यात आली आहे. एवढे मोठे नुकसान होऊनही वन विभागाचे अधिकारी सुस्त आहेत. सदर साग रोपवनाची पाहणी केली असता, साग वृक्षाची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड झाली असल्याचे दिसून आले. वन जमीन व साग रोपवनातून होणाºया अवैध मुरूम खणनास जबाबदार असणाºया वनाधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.पूल बांधकामासाठी माती व मुरूमाचे खननजोगीसाखरा-वैरागड मार्गाच्या नाल्यावरील पूल बांधकामासाठी तसेच रस्त्यासाठी लगतच्या जंगलातीलच माती व मुरूम जेसीबी सहाय्याने खणन करून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे सभोवतालच्या वनाचे व वन जमिनीचे मोठे नुकसान होत आहे. कारवाई होत नसल्याने मात्र हा विषय चर्चेचा ठरला आहे.