शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उसेगाव गाढवी नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

दरवर्षी देसाईगंज तालुक्यातील नदीघाटांचे लिलाव होऊन करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने  रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टरने व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती चोर मालामाल होत आहेत. उसेगाव कमी वस्तीचे गाव असून काही अंतरावर गावानजीकच गाढवी नदी आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरुड : देसाईगंजवरून ८ किमी अंतरावर असलेल्या उसेगाव गाढवी नदीपात्रातून अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे व इतर साधनांद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याने महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. दरवर्षी देसाईगंज तालुक्यातील नदीघाटांचे लिलाव होऊन करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने  रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टरने व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती चोर मालामाल होत आहेत. उसेगाव कमी वस्तीचे गाव असून काही अंतरावर गावानजीकच गाढवी नदी आहे. गावानजीक गाढवी नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा घेत काही ट्रॅक्टरधारक व इतर नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहेत.  रेतीच्या उपशामुळे नदी पात्र खोलगट स्तरापर्यंत पोहोचले आहे.  रेतीचा अवैधरित्या उपसा करण्यासाठी रात्री १२ नंतरचा कालावधी रेती चोरांसाठी फलदायी असल्याचे कळते. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता रेती चाेरी सुरू आहे. शासन स्तरावरून रेती चोरीचे प्रकरण होऊ नये यासाठी आणखी काही बदल करून रेती तस्करीला कसा आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

 

टॅग्स :sandवाळू