शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी-विहीरगाव घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरूच

By admin | Updated: June 3, 2016 01:21 IST

गौण खनिजांचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करूनही आरमोरी तालुक्यातील ...

१५ ट्रॅक्टर कार्यरत : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षवैरागड : गौण खनिजांचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करूनही आरमोरी तालुक्यातील कुकडी-विहीरगाव घाटावरून मागील चार महिन्यांत २५ हजार ट्रॅक्टरपेक्षा अधिक रेतीचा उपसा झाला आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच पर्यावरणाचेही अतोनात नुकसान होत आहे. वैरागड तलाठी साजा क्रमांकात वैलोचना नदीघाट, करपडा घाट, खोब्रागडी घाट असे तीन घाट लिलाव प्रक्रियेने रेती कंत्राटदारांनी शासनाकडे महसूल भरून लिलावात घेतले. मात्र खोब्रागडी नदीवरील विहीरगाव तलाठी साजा अंतर्गत येणाऱ्या कुकडी-विहीरगाव घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. मात्र या घाटावरून वडधा, विहीरगाव, देलोडा, बोडधा, देशपूर, नरोटी, नरोटी चक व परिसरातील १० गावांतील ट्रॅक्टर मालक घाटावरून रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. कुकडी येथील गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून या मार्गाने रोज १० ते १५ ट्रॅक्टर दिवस व रात्रभर रेतीची वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या लोकांना झोप लागत नाही. या परिसरात सुरू असलेल्या शासकीय व खासगी बांधकामांना रेती पुरविली जात आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या आशीर्वादाने कुकडी-विहीरगाव घाटावरून रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. याबाबत मंडळ अधिकारी व्ही. डी. घरत यांना विचारणा केली असता, रेतीची तस्करी रात्री होत असल्याने आपण एकटा काहीच करू शकत नाही. तलाठ्यांनीही अवैध उत्खननावर लक्ष ठेवावे. आतापर्यंत १६ वाहनांवर कारवाई केली आहे, अशी माहिती दिली. तहसीलदार वलथरे यांनी अवैध रेतीचा उपसा होत असेल तर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. (वार्ताहर)