शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात क्रीडा कौशल्याची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:09 IST

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्यातूनही राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्व तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय .....

ठळक मुद्देगुणवंत खेळाडूंची होतेय कुचंबना : सर्व तालुक्यांचे क्रीडा संकुल पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्यातूनही राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्व तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतला होता. त्याला आता पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी ही तालुका क्रीडा संकुले अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या गुणवंत खेळाडूंची उपेक्षा होत आहे.प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारल्यास खेळाडूंना विविध खेळांचे तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळेल. त्यातून अनेक खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळून त्यांना विविध खेळांमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल या उदात्त हेतूने हा निर्णय घेतला होता. पण विविध कारणांनी जिल्ह्यातल्या १२ पैकी एकाही तालुक्यात क्रीडा संकुल पूर्णत्वास जाऊ शकले नाही.क्रीडा संकुलांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये मंजूर आहेत. तरीही हे काम पूर्ण का झाले नाही हे एक कोडेच आहे. सध्या सिरोंचा, अहेरी, आरमोरी व देसाईगंज या चार ठिकाणच्या तालुका क्रीडा संकुलांची कामे अर्धवट झालेली आहेत. ७० ते ८० टक्के काम झाले आहे. पण पूर्ण काम कधी होईल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. धानोरा, एटापल्ली, भामरागड व चामोर्शी येथे क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली पण काम अद्याप सुरू झाले नाही. त्यासाठी संबंधितांना अद्याप मुहूर्तच सापडला नाही.प्रत्येक तालुका क्रीडा संकुल कार्यालयात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी एक तालुका क्रीडा अधिकारी, २ क्रीडा मार्गदर्शक, एक शिपाई, एक क्लार्क, एक महारेकरी अशी पदे राहणार आहेत. सिरोंचा, अहेरी, आरमोरी येथे ही पदे मंजूर झाली आहेत, पण ती भरलेलीच नाही. देसाईगंजमध्ये अद्याप पदेही मंजूर करण्यात आलेली नाहीत. ग्रामीण क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी तालुका क्रीडा संकुलांबाबतची ही उदासीनता लवकरात लवकर दूर करावी अशी अपेक्षा तमाम युवा खेळाडूवर्गाकडून होत आहे.असे कसे आमदारांचे नियंत्रण?तालुका क्रीडा संकुलांच्या उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तालुका क्रीडा संकुल समित्या बनविण्यात आल्या आहेत. सुरूवातीला या समित्यांचे अध्यक्षपद संबंधित उपविभागीय अधिकाºयांकडे होते. पण नंतर ते त्या क्षेत्राच्या आमदारांकडे देण्यात आले. या समित्यांच्या बैठका होऊन त्यात संकुल उभारणीच्या कामाचा आढावा घेणे, अडचणी दूर करणे अपेक्षित आहे. मात्र समितीच्या बैठकाच होत नाही. त्यामुळे हे काम किती पूर्ण झाले, कशासाठी रखडले यावर आमदारांसह कोणाचेच नियंत्रण नाही.तीन तालुक्यात जागाच मिळाली नाहीगडचिरोलीसह कोरची आणि कुरखेडा या तीन तालुक्यात क्रीडा संकुलासाठी अद्याप जागाच मिळाली नाही. तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा सरकारचा धोरणात्मक निर्णय असताना त्यासाठी पाच वर्षात साधी एक हेक्टरसुद्धा जागा मिळू नये यावरून या विभागाचा कारभार किती प्रामाणिकपणे सुरू आहे याची कल्पना येते.सार्वजनिक बांधकाम विभागावर अविश्वासकोणतेही शासकीय बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची निर्मिती केली आहे. त्यांच्यामार्फत छोटी-मोठी सर्व बांधकामे केली जातात. पण क्रीडा विभागाला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीची कामे या विभागाने स्वत:च टेंडर बोलवून दिली आहेत. त्यामुळेच ही कामे रखडली असल्याचा नाराजीचा सूर खेळाडूंकडून व्यक्त होत आहे. समितीचे अध्यक्ष या नात्याने संबंधित आमदारांना विनाकारण यात युवा वर्गाची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे.संकुलात अशा राहतील सोयीसुविधातालुकास्तरावरील क्रीडा संकुल १ ते २ हेक्टर जागेत उभारले जाणार आहे. त्यात एक रनिंग ट्रॅक, बहुउद्देशिय सभागृह, प्रसाधन गृह, क्रीडा विभागाचे कार्यालय, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल अशा स्थानिक खेळांची मैदाने आदींचा त्यात समावेश राहणार आहे. पण बांधकामाचे भिजत घोंगडे सुरू असल्यामुळे या सोयी उपलब्ध होणे हे अजून तरी दिवास्वप्नच राहिले आहे.