शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पीएमचे पैसे हवे, तर लवकर करा मोबाइल नंबर अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:41 IST

दुरुस्तीसाठी मुदतवाढ : चुकीच्या डाटामुळे अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करताना शेतकऱ्यांनी नोंदणीच्या वेळी दिलेले मोबाइल क्रमांक चुकीचे असल्याचे आढळून आलेले आहेत. सदर मोबाइल क्रमांक दुरुस्तीची संधी राज्य शासनाने दिली होती. ३१ ऑगस्टपर्यंत ही मुदत होती. आता यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे योजनेचे पैसे लटकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला मोबाइल क्रमांक बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी पोर्टलवर माहिती अपलोड करताना चुकीच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ते दुरुस्त करून घेण्यासाठी राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत भ्रमणध्वनी क्रमांक दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. तेव्हाच यापुढील पीएम किसान सन्मान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. 

ईकेवायसी बाकी जिल्ह्यात दीड लाखांवर शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभासाठी पात्र आहेत. यापैकी चार हजारांच्या आसपास शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही. हे शेतकरी निधीच्या लाभापासून वंचित आहेत.

मोबाइल नंबर दुरुस्तीसाठी मुदत मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी शासनाने सुरुवातीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. आता मुदतवाढ दिली असून १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना दुरुस्ती करता येणार आहे.

आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक हवा पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना लाभार्थ्यांनी त्यांचा आधार संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीवेळी लाभार्थ्यांचा एक भ्रमणध्वनी क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आल्याचे ऑनलाइन पोर्टलवर दिसत आहे.

मोबाइल दुरुस्तीबाबत जागृती करण्याची गरज कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी जागृती केली जात आहे; परंतु याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नसल्याने ते शेतकरी अजूनही मोबाइल क्रमांक बदलायचे आहेत.

असा करावा मोबाइल क्रमांक अपडेट शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर क्लिक करावे. त्यात उजव्या बाजूला फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाइल नंबरवर क्लिक करावे. अपडेट मोबाइल नंबर ही विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाकल्यानंतर नंबर अपडेट होईल.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली