शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जीएनएम बंद झाल्यास आरोग्य व्यवस्था विस्कळीत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:45 IST

दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षीत नर्सेस करीत आहेत. मात्र इंडियन नर्सिंग कौन्सील व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने जीएनएम अभ्यासक्रम बंद करण्याचे नोटीफिकेशन काढले आहे.

ठळक मुद्देअभ्यासक्रम सुरू ठेवावा : डॉ. प्रमोद साळवे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षीत नर्सेस करीत आहेत. मात्र इंडियन नर्सिंग कौन्सील व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने जीएनएम अभ्यासक्रम बंद करण्याचे नोटीफिकेशन काढले आहे. हा अभ्यासक्रम बंद झाल्यास ग्रामीण व दुर्गम भागात सेवा देणाऱ्या नर्सेस मिळणे कठीण होऊन आरोग्य सेवा विस्कळीत होईल, अशी शक्यता आयुर्वेद उत्कर्ष मंडळ विदर्भ प्रदेश नागपूरचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे यांनी व्यक्त केली आहे.जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करून त्याचे रूपांतर बीएससी नर्सिंगमध्ये केले जाणार आहे. हा उद्देश चांगला आहे. मात्र वस्तूस्थितीला धरून नाही. कारण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर खासगी रूग्णालयांमध्ये ९५ टक्के नर्सेस जीएनएम अभ्यासक्रम केलेल्या आढळतात. गोरगरीब पाकलाच्या मुली जीएनएम करून नोकरी प्राप्त करतात. जीएनएमला सहज अ‍ॅडमिशन मिळते. निकालही चांगला लागतो. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा असल्याने दुर्गम भागातील मुलींना अभ्यासाची अडचण जात नाही. मात्र बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम फक्त इंग्रजी माध्यमामध्ये राहतो. ग्रामीण भागातील मुली या अभ्यासक्रमाला शिकणार नाही. जीएनएमला कोणत्याही शाखेची विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकते. मात्र बीएससी नर्सिंगला विज्ञान आवश्यक आहे. बीएससी नर्सिंग केलेल्या विद्यार्थिनी ग्रामीण भागात जाऊन सेवा देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जीएनएम अभ्यासक्रम बंद करू नये, अशी मागणी डॉ. प्रमोद साळवे यांनी केली आहे.पीएचसीला नर्सेस मिळणे होईल कठीणबीएससी नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनी ग्रामीण व दुर्गम भागात काम करण्यास सहजासहजी तयार होत नाही. ग्रामीण भागात आजही जीएनएमचे प्रशिक्षण घेतलेल्या नर्सेस आहेत. हा अभ्यासक्रम बंद केल्यास ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी नर्सेस मिळणे कठीण होईल.