देसाईगंज : कुरूड येथील युवती सोनिया योगेश देशपांडे हिच्या आत्महत्येचे गूढ तिच्या डायरीवरून उलगडले होते. आता सोनियाच्या घरी तिच्या आजोबाला सोनियाच्या मैत्रिणीचे तिच्या प्रेम प्रकरणाबाबतचे पत्र मिळाल्याने या प्रेम प्रकरणात दोन युवतींचे दोन युवकांसोबत संबंध असल्याच्या बाबीला पुष्टी मिळाली आहे. दोन युवकांचे दोन मैत्रिणीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. मात्र प्रियकरांकडून त्यांची दिशाभूल होत असल्याचे या पत्रावरून स्पष्ट होते.सोनिया देशपांडे हिच्या आत्महत्या प्रकरणाचे एकाहून एक रहस्य पुढे येत असताना देसाईगंज पोलिसांनी मात्र संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले नाहीत तसेच त्यांना अटकही केली नाही. त्यामुळे देसाईगंज पोलिसांची या प्रकरणात संशयास्पद भूमिका आहे, असा आरोप सोनियाचे आजोबा रामकृष्ण देशपांडे यांनी केला आहे. सोनियाच्या मैत्रिणीच्या प्रेम प्रकरणाचे पत्र सोनियाच्या आजोबांना घरी मिळाले. या पत्रात प्रियकर युवकांकडून लग्नाचे खोटे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक शोषण होत असल्याचा मजकूर सोनियाच्या मैत्रिणीच्या पत्रात नमूद आहे. यावरून सोनियाच्या मैत्रिणीची दिशाभूल झाली असल्याचे स्पष्ट होते.
सोनियाच्या मैत्रिणीचे पत्र मिळाले
By admin | Updated: May 20, 2015 02:03 IST