शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कामगार दिनीच कामगारांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:11 IST

रोजगारासाठी वनवन भटकणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना लॉयड मेटलच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. मात्र एटापल्लीजवळ झालेल्या अपघातानंतर लोहखनिज उत्खननाचे काम बंद पडले. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या शेकडो मजुरांचा रोजगार बंद झाला आहे.

ठळक मुद्देशेकडो मजुरांवर बेरोजगारीचे संकट : साडेतीन महिन्यांपासून सुरजागड येथील काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगारासाठी वनवन भटकणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना लॉयड मेटलच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. मात्र एटापल्लीजवळ झालेल्या अपघातानंतर लोहखनिज उत्खननाचे काम बंद पडले. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या शेकडो मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. रोजगार मिळण्यासाठी काम पुन्हा सुरू करावे, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.लॉयड मेटल्स अ‍ँड एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु होते. या कामावर शेकडो मजूर काम करीत होते. परंतु १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रकने बसला चिरडल्याने चार जण ठार झाले. या अपघातानंतर अचानक लोहखनिज उत्खननाचे काम बंद करण्यात आले. यामुळे शेकडो मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले. त्यानंतर काम सुरु करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना मजुरांनी एक पत्र दिले होते. काम सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही मजुरांनी दिला होता. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने अनेक मजुरांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण आरंभिले होते. दोन दिवसांनतर काम पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.परंतु साडेतीन महिने उलटूनही काम सुरु न झाल्याने उत्खननाच्या कामावरील मजूर, ट्रक व ट्रॅक्टरचालक आणि त्यावरील कामगारांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत असून, ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे उत्खननाचे काम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी स्थानिक मजुरांनी केली आहे.गडचिरोली जिल्हा आधीच उद्योगविरहीत असून, लॉयड मेटल्स कंपनीच्या माध्यमातून कोनसरी येथे उद्योग सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला होता. ज्या शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशांचे वाटपही करण्यात आले होते. परंतु अपघातातनंतर काही राजकीय मंडळींनी उत्खननाचे काम बंद करण्यास भाग पाडल्याने मजुरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्खनन तत्काळ सुरु न झाल्यास सुरजागड या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जिल्हावासीयांना मुकावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.