शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

दीडशे युवकांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश

By admin | Updated: September 14, 2016 01:51 IST

महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांच्या उपस्थितीत

नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर : विजय वडेट्टीवार, रवींद्र दरेकर यांनी केले स्वागतगडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शहरातील दीडशे युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, रवींद्र दरेकर यांनी प्रवेशित युवकांचे स्वागत केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव लतादेवी पेदापल्ली यांच्या नेतृत्त्वात युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या युवकांमध्ये प्रशिक रायपुरे, जितु गौतम, आकाश बच्चलवार, अमजद पठाण, चेतन शांतलवार, गुलाब मेश्राम, शर्मिश वासनिक, प्रशांत रणदिवे यांच्यासह दीडशे युवकांचा समावेश आहे. पक्ष प्रवेशाप्रसंगी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जेसा मोटवानी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे नरेंद्र भरडकर, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे, माजी प्रदेश सदस्य सगुणा तलांडी, प्रभाकर वासेकर, बंडू शनिवारे, संजय वानखेडे, हरबाजी मोरे, सुनील वडेट्टीवार, सुनील पोरेड्डीवार, नगरसेविका निलोफर शेख, प्रतीक बारसिंगे, कमलेश खोब्रागडे यांच्यासह कॉँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. जिल्हा काँगे्रस व महिला जिल्हा काँग्रेसच्या वतीने यंदा प्रथमच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. रविवारी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला आ. विजय वडेट्टीवार, रवींद्र दरेकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ त्यांंच्या हस्ते करण्यात आला. याच दरम्यान शहरातील युवकांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या युवकांच्या गळ्यात पक्षाचा दुप्पटा टाकून आ. वडेट्टीवार व दरेकर यांनी त्यांचे पक्षात उत्स्फूर्त स्वागत केले. पक्ष प्रवेशाने युकाँला बळकटी येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)