शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्ली तहसीलवर धडकले शेकडो ट्रॅक्टरधारक

By admin | Updated: August 26, 2015 01:22 IST

गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणून जिल्ह्यातील सुशिक्षित ट्रॅक्टरधारक बेरोजगारांना खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देण्यात यावे,

एटापल्ली : गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणून जिल्ह्यातील सुशिक्षित ट्रॅक्टरधारक बेरोजगारांना खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन ट्रॅक्टर मालक-चालक संघटना एटापल्लीच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, १०० हून अधिक ट्रॅक्टरधारक ट्रॅक्टरसह तहसील कार्यालयावर धडकले.शासनाने नवा शासन निर्णय जारी करून गौण खनिज वाहतूक व उत्खननासंदर्भात ट्रॅक्टरधारकांवर जाचक अटी लादल्या. त्यामुळे रेती व इतर गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कठीण झाले आहे. यामुळे एटापल्ली तालुक्यातील ट्रॅक्टरधारकांनी गेल्या अनेक दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. दरम्यान, अनेक ट्रॅक्टर मोकळ्या जागेत उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. मात्र ट्रॅक्टर मालक-चालक संघटनेच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांपुढे उपासमारीची समस्या निर्माण झाली. अखेर संतप्त ट्रॅक्टरधारकांनी मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर ट्रॅक्टरसह मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. ट्रॅक्टर मालक-चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना कार्यालयात भेटून त्यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. तसेच एटापल्लीचे नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, डी. आर. म्हैत्रे यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन देताना ट्रॅक्टर मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष विलास चिटमलवार, पं. स. सभापती दीपक कुलसंगे, पं. स. उपसभापती संजय चरडुके, रमेश गंपावार, दौलत दहागावकर आदींसह जारावंडी, हालेवरा व गट्टा परिसरातील ट्रॅक्टर मालक उपस्थित होते. ट्रॅक्टरसह निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील सर्व ट्रॅक्टर मालक-चालक व ट्रॅक्टरवरील मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)