शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

दीड हजार घरकुलांना प्रारंभच नाही

By admin | Updated: April 11, 2016 01:36 IST

इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले.

इंदिरा आवास योजना : चालू आर्थिक वर्षातही कामात गती नाहीगडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी ३ हजार २३३ घरकुलांच्या कामांना सुरूवात झाली आहे. तर तब्बल १ हजार ६३५ घरकुलाच्या कामांना अद्यापही प्रारंभच झाला नसल्याची माहिती आहे. परिणामी गतवर्षीप्रमाणे यंदाही घरकुलाचे काम मंदगतीने सुरू असल्याचे दिसून येते. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाने गडचिरोली जिल्ह्याला इंदिरा आवास योजनेंतर्गत एकूण ५ हजार १६८ घरकुलांचे उद्दिष्ट दिले. यापैकी बाराही तालुक्यात ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांमध्ये अहेरी तालुक्यात १ हजार ९३, आरमोरी तालुक्यात २११, भामरागड १५१, चामोर्शी ७७८, देसाईगंज ७६, धानोरा ४२३, एटापल्ली १५२, गडचिरोली ७३०, कोरची २७३, कुरखेडा ४४०, मुलचेरा २९० व सिरोंचा तालुक्यातील २७८ घरकुलांचा समावेश आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घरकूल मंजूर करण्यात येतात. मात्र लाभार्थ्यांची अनास्था व प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे घरकूल कामात गती राहत नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात ५४२, आरमोरी तालुक्यात १७१, भामरागड ८६, चामोर्शी ३२२, देसाईगंज ७७, धानोरा ३४६, एटापल्ली ८१, गडचिरोली ६६७, कोरची २४२, कुरखेडा ३२९, मुलीचेरा १३७ व सिरोंचा तालुक्यात १८५ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत पंचायत समिती प्रशासनाच्या कार्यवाहीनंतर घरकूल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट घरकुलाच्या अनुदानाची रक्कम अदा केली जाते. घरकूल बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाकडे निधी उपलब्ध आहे. घरकूल बांधकामासाठी अनुदानही दिले जात आहे. मात्र जिल्ह्यात पाहिजे त्या गतीने घरकुलांचे बांधकाम होत असल्याचे दिसून येत नाही. घरकूल बांधकामात गती आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. (स्थानिक प्रतिनिधी)