शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडेला फेकले शेकडो रोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:09 IST

वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे.

ठळक मुद्देखड्डे खोदणे व रोपट्यांचा खर्च पाण्यात : चौकशी करून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे.१ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविली जात आहे. केवळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नको त्या ठिकाणी खड्डे खोदून वृक्ष लागवडीचा फार्स आटोपला जात आहे. वृक्ष लागवडीनंतर त्याला कठडा केला जात नसल्याने दुसऱ्याच दिवशी किंवा काही वेळातच जनावरे सदर झाड फस्त करीत आहेत.वैरागड मार्गावर पाठनवाडा ते कराडीदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. मात्र या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड केली नाही. रस्त्याच्या बाजूला रोपटे अस्ताव्यस्त पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजले सुद्धा आहेत. खड्डे व वृक्षांचा खर्च वाया गेला आहे. असे प्रकार जिल्हाभरात अनेक ठिकाणी घडले आहेत.विशेष म्हणजे अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूला लागवड न करताच रोपटे फेकण्यात आले आहेत. वनविभाग जंगलात लाखो झाडांची लागवड करीत असल्याचे दाखविते. मात्र खरच लागवड होते काय व त्यातील किती वृक्ष जगतात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लाखो झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र झाडे न लावताच सदर पैसे परस्पर खर्च केले जात असल्याचा प्रकार नाकारता येत नाही. किती झाडे लावण्यात आली, त्यातील किती झाडे जगली, याचा सर्वेक्षण होणे गरजचे आहे. अन्यथा पुन्हा पुढील १० वर्ष लागवड झाली तरी वृक्षांची संख्या वाढणार नाही.