गडचिरोली : अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या सदस्यांनी आज सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना अटक करून सुटका केली. अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, शिक्षणाचा दर्जा सुधारावा, अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी व गैरआदिवासींच्या शाश्वत विकासाकरीता पेसा कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, जिल्हा मंडळ स्थापन करून जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. शनिवारी आंदोलकांनी आत्मदहन करण्याचे ठरविले होते. मात्र तत्पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलाविले. चर्चेदरम्यान काही मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र लेखी लिहून देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आंदोलन सोमवारपर्यंत चालले. आज सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या आंदोलकांनी खांब गाडले व त्यांना दोरखंड बांधण्याची तयारी सुरू केली. याची भनक पोलिसांना लागली. याबद्दलची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल खाडे यांना दिल्यानंतर १०.३० वाजता ते आंदोलनस्थळी दाखल झाले. सर्व आंदोलकांना तत्काळ अटक करून शहरातील ठाण्यात आणण्यात आले. त्याचबरोबर चौकातीलही आंदोलकांना अटक केली. (प्रतिनिधी0
शेकडो आंदोलकांना पोलिसांनी केली अटक
By admin | Updated: December 8, 2014 22:34 IST