ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, गडचिरोली जिल्ह्यासह सात जिल्ह्यांतील कमी झालेले आरक्षण पूर्ववत केल्यानंतरच पोलीस भरती, आरोग्य भरती व इतर पद भरती करण्यात यावी, नव्याने सर्वेक्षण करून अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावातील गैरआदिवासी लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे उपलब्ध करावी, यांच्यासह अन्य मागण्या माेर्चातून मांडल्या जाणार आहेत. कोरची येथील महात्मा फुले चौकासमोर पार पडलेल्या सहविचार सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदकिशोर वैरागडे, अशोक गावतुरे, राष्ट्रपाल नखाते, प्रा. वासुदेव मांडवे, प्रा. संजय दोनाडकर, भजन मोहुले, नैताम कौशिक, दामू येवले, नंदकिशोर शेंडे, आसाराम सांडील, केशव मोहुर्ले, विठ्ठल शेंडे, वीरेंद्र आंदे, विजय कावळे, डॉ. नारायण देशमुख, बंडू ढोरे, अनिल वाढई, राजू गुरुनुले, डॉ. दीनानाथ बिसेन, कृष्णा कावळे, रामकुमार नाईक, राहुल मांडवे, मनोहर मेश्राम, गोविंद दरवडे, घनश्याम चांदेकर, प्रकाश कौशिक, प्रमेश्वर लोहंबरे, केशव लेनगुरे, राजाराम उईके, आसाराम शेंडे, बळिराम दरवडे, महादेव बन्सोड, अंकुश चोपकार, किशोर सांडील, मधुकर नखाते, प्रकाश कावळे, रवींद्र कावळे, गुणाजी लेनगुरे, नंदकिशोर गोंबाडे यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.
कोरची तालुक्यातील शेकडाे ओबीसी मोर्चात सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST