शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे शेकडो हेक्टवरील कोट्यवधींची वनसंपदा नष्ट

By admin | Updated: March 17, 2017 01:19 IST

मागील आठ दिवसांत आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड, गडचिरोली तालुक्यातील पोर्ला

वन विभागाचे होत आहे दुर्लक्ष : वैरागड, पिसेवडधा, डोंगरतमाशी तसेच कुरखेडा व कोरची तालुक्यातील जंगलाला आग वैरागड : मागील आठ दिवसांत आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड, गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वन परिक्षेत्रातील मोहटोला, लोहारा, नरचुलीच्या जंगलात आग लागली असून या आगीत कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होत आहे. मात्र वन विभागाची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्याला सुरूवात होताच जंगलांना आगी लागण्यास सुरूवात होते. याचा अनुभव वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. यावर्षी वन विभागाने जंगलातील आगी थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आरमोरी, कुरखेडा, पोर्ला वन परिक्षेत्रातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड येथे कृत्रित रोपवाटिका आहेत. या रोपवाटीकेत वनवा लागला आहे. कुरखेडा, कोरची तालुक्यातील जंगल आगीत नष्ट झाले आहे. पोर्ला वन परिक्षेत्रातील मोहटोला, लोहारा, नरचुलीपर्यंतच्या जंगलाला आग लागली आहे. आग विझविण्यासाठी कोणती उपाययोजना वन विभाग करताना दिसत नाही. ज्या ठिकाणी खोटे मजूर दाखवून आर्थिक चिरीमिरी मिळते. त्या ठिकाणी फायरलाईन जाळण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ज्या वन क्षेत्रात वनवे लागतील. त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला जबाबदार धरून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. शासन कोट्यवधी रूपये मंजूर करते व ते खर्चही होतात. मात्र जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण तसूभरही कमी झाले नाही. आग लागण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने शासनाचा पैसा वन विभागाचे अधिकारी केवळ लाटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. वन विभागाने प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यावर विशिष्ट भूभागाची जबाबदारी निश्चित करावी व त्या भूभागावर आग लागल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करावी, असे झाल्यास वन विभागाचे कर्मचारी अधिक दक्ष राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)