शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चार नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

By admin | Updated: October 3, 2016 02:09 IST

गडचिरोली नगरपालिकेच्या चार नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर : शहरात राजकीय उलथापालथगडचिरोली : गडचिरोली नगरपालिकेच्या चार नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यामुळे भाजप प्रवेशित नगरसेवकांची संख्या आता पाच झाली आहे. यापूर्वी नगरसेवक संजय मेश्राम यांनी भाजपात प्रवेश केला होता. रविवारी माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक आनंद श्रुंगारपवार, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, नगरसेवक अजय भांडेकर, पूनम भांडेकर या चौघांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत. दरम्यान या चौघांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला गडचिरोली शहरात मोठी बळकटी मिळाली असल्याची भावना खासदार अशोक नेते यांनी यावेळी व्यक्त केली. पक्षप्रवेशाप्रसंगी आनंद श्रुंगारपवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरीही सरस आहे. देश व राज्य विकासात भरीव कार्य करीत असलेल्या भाजप सरकारच्या माध्यमातून गडचिरोली नगराचा विकास साध्य करण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक आनंद श्रुंगारपवार व त्यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मुहूर्त गवसला नव्हता. दरम्यान खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर रविवारी या चौघांनी पक्षात प्रवेश केला. यापूर्वी संजय मेश्राम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता भाजप प्रवेशित नगरसेवकांची संख्या पाच झाली आहे. पक्ष प्रवेशाच्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, रमेश भूरसे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, गजानन येनगंधलवार, रेखा डोळस, हेमंत राठी, नंदू काबरा, प्रकाश अर्जूनवार, संजय बारापात्रे, डॉ. भारत खटी, भाजयुमोचे स्वप्नील वरघंटे, पराग पोरेड्डीवार, अनिल करपे, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)