ठाणेदारांनी दाखविली हिरवी झेंडी : संविधानाबद्दल आदरभाव झाला व्यक्तंगडचिरोली : संविधान दिनानिमित्त क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरूवारी संविधान दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडमध्ये विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन संविधानाबद्दल आदर असल्याची भावना व्यक्त केली. संविधान दौडमध्ये गडचिरोली शहरातील क्रीडापटू, विद्यार्थी व नागरिक असे एकूण १७७ जण सहभागी झाले. दौड स्पर्धा स्थानिक गांधी चौक येथून सकाळी ७.३० ला सुरु होण्याआधी क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी प्रस्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी हिरवी झेंडी दाखवून दौड आरंभ केली. तत्पुर्वी जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दौडबद्दल सूचना देऊन मार्गदर्शन केले. सदर दौड स्पर्धा इंदिरा गांधी चौकापासून आयटीआय चौकापर्यंत आयोजित करण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक रामदास ढोके, सहायक पोलीस निरीक्षक माळी, उपस्थित होते तर क्रीडा अधिकारी मदन टापरे, क्रीडा अधिकारी भूषण कळमकर, गणेश गोल्हर, अहेरी तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा मार्गदर्शक बडकेलवार, संदीप उईके, तालुका क्रीडा अधिकारी आशिष नंदनवार, सुनील चंद्रे, गडचिरोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, गडचिरोली वाहतूक शाखेच्या पोलिसांचे सहकार्य लाभले. (स्थानिक प्रतिनिधी)
संविधान दौडमध्ये शेकडों स्पर्धक धावले
By admin | Updated: November 27, 2015 01:44 IST