शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंगच्या माध्यमातून मानवसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:42 IST

नर्सिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच रूग्णांची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन : डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये नृत्य स्पर्धा थाटात

आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : नर्सिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच रूग्णांची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. त्यामुळे नर्सिंग हे मानवसेवेचे महत्त्वाचे साधन आहे. दगडाच्या माध्यमातून रस्ते, इमारत यासारखी विकास कामे करता येतात. मात्र हाच दगड डोके फोडण्याकरिताही वापरला जातो. एकंदरीतच आपल्याकडील ज्ञानाचा चांगल्या कामासाठी वापर करावा, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज स्टुडंट नर्सेस असोसिएशनतर्फे महाविद्यालयात ओपन टॅलेंट कॉन्टेस्ट (नृत्य स्पर्धा) स्पर्धेचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या स्पर्धेत २७ संघांनी सहभाग घेतला होता. विजयी संघांना आ. विजय वडेट्टीवार यांच्या बक्षीस हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफचे कमांडंट त्रिपाठी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, अ‍ॅड. संजय गुरू आदी मान्यवर उपस्थित होते.कमांडंट त्रिपाठी यांनी विद्यार्थिनींमधील कलागुणांचे कौतुक केले. जेसा मोटवानी यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात विजय वडेट्टीवार यांचा मोलाचा वाटा आहे. देसाईगंज येथे उद्योग व शैक्षणिक संस्थांसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक संस्था व उद्योग निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद साळवे यांनी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले. संचालन पुरूषोत्तम भागडकर तर आभार दिशांकी भागडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निता बावणे, नेहा तिवारी, मेघा नागपूरकर, मृणाल बुद्धे, रोशन करडे, नीलिमा अंबादे, प्रियंका निमगडे, रेश्मा चिपेली, प्राजक्ता भांडेकर, पल्लवी लोंढे, शिल्पा तलांडे, विनोद दुर्गे, स्नेहा गेडाम, सोनाली कुंजाम, तेजस्वीनी लाकडे, सुनीता पुसाली, प्राची नारनवरे, पूजा कुमरे, ओजस्वीनी नरताम, सुश्मिता रॉय, काजल उडाण, काटकुरवार, अश्विनी अंबादे, अश्विनी पदा, प्रिया आत्राम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.विजेत्यांचा गौरवयाप्रसंगी घेण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक पार्वती मतिमंद विद्यालय देसाईगंज, द्वितीय सिमिकॉर गु्रप देसाईगंज तर तृतीय पारितोषिक डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजच्या जय महाकाली जीएनएम तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींनी पटकाविला. विजेत्यांचा गौरव करण्यात आला.