शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रणमुक्त पेट्राेल-डिझेल दाेन महिन्यांपासून स्थिर कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

खासगी व सरकारी कंपन्यांमार्फत देशभरात पेट्राेल व डिझेलची विक्री हाेते. बहुतांश पेट्राेल व डिझेल आयात केला जाताे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवर्षी कच्च्या तेलाच्या किमती बदलतात. त्यानुसार दाेन महिन्यांपूर्वी पर्यंत दरदिवशी पेट्राेल व डिझेलचे भाव बदलत हाेते. मात्र दाेन महिन्यांपासून अचानक भाव स्थिर आहेत. आता भाव कसे स्थिर आहेत, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : सरकारचे पेट्राेल व डिझेलच्या किमतीवर काेणतेही नियंत्रण नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार झाल्यास त्यानुसार पेट्राेल व डिझेलच्या किमती बदलतात, असे सरकारकडून सांगण्यात येते. मात्र मागील दाेन महिन्यांपासून पेट्राेल व डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काेणताही बदल झाला नाही काय, असा प्रश्न नागरिकांना पडला  आहे. खासगी व सरकारी कंपन्यांमार्फत देशभरात पेट्राेल व डिझेलची विक्री हाेते. बहुतांश पेट्राेल व डिझेल आयात केला जाताे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवर्षी कच्च्या तेलाच्या किमती बदलतात. त्यानुसार दाेन महिन्यांपूर्वी पर्यंत दरदिवशी पेट्राेल व डिझेलचे भाव बदलत हाेते. मात्र दाेन महिन्यांपासून अचानक भाव स्थिर आहेत. आता भाव कसे स्थिर आहेत, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

निवडणुकीचा तर परिणाम नाही ना?फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश, पंजाब, गाेवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये विजय केंद्र शासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या राज्यातील निवडणुका लक्षात घेऊनच केंद्र शासनाने भाव स्थिर ठेवले असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

डिझेलचे भाव स्थिर असूनही महागाई चढतीवरच

१  डिझेलचे भाव वाढल्यास इतर वस्तूंचे भाव वाढतात, असे सांगितले जाते. ते काही प्रमाणात सत्यसुद्धा आहे. मात्र पेट्राेल व डिझेलचे भाव मागील दाेन महिन्यांपासून स्थिर आहेत. तरीही महागाई वाढतच चालली आहे. 

२  एकदा वाढविलेल्या किमती दुकानदार सहजासहजी कमी करत नाही. कारण तेवढी किंमत माेजण्याची ग्राहकाची मानसिकता तयार झाली राहते. त्यामुळे खर्च कमी झाला तरी व्यापारी, उद्याेजक वस्तूंच्या किमती कमी हाेत नाही. 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल