शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तलावांमध्ये वस्त्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:17 IST

गडचिरोली शहरात पाच तलाव आहेत. या तलावांमध्ये अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली आहेत.

ठळक मुद्देशेती धोक्यात : कारवाई नसल्याने अतिक्रमण बोकाळले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरात पाच तलाव आहेत. या तलावांमध्ये अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली आहेत. अतिक्रमणाचा दरवर्षी विस्तार होत असल्याने तलावांचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यावर अवलंबून असलेली शेतजमीनही अडचणीत आली आहे.जिल्हा निर्मितीपूर्वी गडचिरोली हे लहानसे खेडे होते. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने गावाच्या सभोवताल पाच तलाव होते. आता हे चारही तलाव शहरात सापडली आहेत. जिल्हा मुख्यालय असल्याने दरवर्षी घरांच्या संख्येत भर पडत आहे. गडचिरोली शहराला विस्तारासाठी फार कमी जागा असल्याने जागेच्या किंमती नागपूर शहराच्या तुलनेतही अधिक आहेत. काही नागरिकांनी तलावामध्ये अतिक्रमण करून जागा पकडली आहे. शहराच्या मध्यभागी आठवडी बाजाराजवळ असलेल्या तलावात तर चारही बाजुने अतिक्रमण झाले आहे. गोकुलनगर मार्गाच्या बाजुला शेकडो घरे बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर गडचिरोली-मूल मुख्य मार्गाच्या बाजुलाही काही नागरिकांनी संरक्षण भिंत टाकून तलावाची जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. गडचिरोली शहरातील जागेचे भाव बघितले तर सदर जागा कोट्यवधी रूपयांची आहे. आरमोरी मार्गावर असलेल्या तलावातही काही नागरिकांनी घरे बांधली आहेत. पावसात तलाव भरल्यानंतर तलावाचे पाणी अंगणात साचते. त्यावेळी दोष नगर परिषदेला दिला जातो. मात्र तलावामध्ये आपण अतिक्रमण करून अवैधरित्या घर बांधले, याची जाणीव या नागरिकांना होत नाही. केवळ नगर परिषदेच्या नावाने बोटे मोडण्याचे काम करीत आहेत. बसस्थानकाजवळ असलेल्या तलावातही अतिक्रमण वाढत चालले आहे. लांझेडा वार्डातील तलावात अलिकडेच नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत.सिंचन विभाग सुस्तशहरातील तलावांमध्ये अतिक्रमण करून जागा गिळंकृत केली जात असताना सिंचन विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका स्वीकारत आहे. काही नागरिक जागा पकडून ती लाखो रूपयांना विकत आहेत. जागा पकडून विकणे हा काही नागरिकांचा धंदाच बनला आहे. परिणामी अतिक्रमणाची समस्या वाढत चालली आहे. याकडे सिंचन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.