शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:31 IST

यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक संततधार पाऊस ८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात झाल्याने बळीराजा पूरता सुखावला आहे.

बळीराजा सुखावला : जिल्ह्यात सरासरी १५.७५ मिमी पाऊस पडलागडचिरोली : यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक संततधार पाऊस ८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात झाल्याने बळीराजा पूरता सुखावला आहे. धानाच्या बांध्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी जमा झाले असल्याने आता चिखलणी व रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात १५.७५ मिमी पाऊस झाल्याची नोंद नियंत्रण कक्षाने घेतली आहे. गडचिरोली तालुक्यात १०.४, धानोरा १६.२, चामोर्शी १, मुलचेरा १.८, देसाईगंज ३३, आरमोरी २८.४, कुरखेडा ४४.१, कोरची ५०.५, एटापल्ली २.२, भामरागड १.८ मिमी पाऊस झाला. तर अहेरी व सिरोंचा तालुक्याच्या पावसाची नोंद नियंत्रण कक्षाकडे झाली नाही. एकूण १८९.४ मिमी पाऊस १५.७५ च्या सरासरीने जिल्ह्यात झाला. ८ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४७८०.१ मिमी पाऊस झाला. या पावसाने शेतकरी सुखावला असून जिल्ह्याच्या सर्वच भागात हा पाऊस झालेला आहे. ८ ते १० जुलै या काळात विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. गडचिरोली शहरातही अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत जात होते. पोलीस ठाण्यासमोरील मोटवानी कॉम्प्लेक्सजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने नजीकच्या दुकानांमध्येही पाणी दिसून येत होते. पावसामुळे दिवसभर शहरातील वाहतूक रोडावलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. सखल भागात पाणी साचल्यामुळे पादचारी व दुचाकी वाहनधारक यांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागला. दुसरा शनिवार व रविवारची सुटी आहे. दुर्गम भागात मुख्यालयी राहून सेवा देणारे कर्मचारी घराकडे निघाले. मात्र कमी उंचीच्या पुलांवर पाणी जमा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका नागरिकांसह कर्मचाऱ्यांना बसला. पुलावरील पाण्याने बसफेऱ्याही रद्द झाल्या. (जिल्हा प्रतिनिधी)