शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘बेस्ट बीफाेर’च्या आदेशाला हाॅटेल व्यावसायिकांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 05:00 IST

खाद्यपदार्थांच्या प्रत्येक सीलबंद पाॅकेटवर निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, हे लिहिलेले राहते. मात्र, अनेक पदार्थ हाॅटेलमध्येच बनवून त्याच ठिकाणी विकले जातात. ते कधी बनविले व  किती दिवसांत ते वापरणे चांगले आहे, याबाबत ग्राहक अनभिज्ञ राहत हाेते. विशेषकरून यातील काही पदार्थ ओले राहत असल्याने ते लवकरच खराब हाेण्याची शक्यता राहते. दुकानदार मात्र मुदत संपली तरी ते पदार्थ विकत हाेते

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : सीलबंद न करता ट्रेमध्ये ठेवून विक्री करणाऱ्या प्रत्येक मिठाई तसेच अन्य पदार्थांवर बेस्ट बीफाेरची तारीख लिहिलेला बाेर्ड असणे आवश्यक आहे. मात्र, लाेकमतने गडचिराेली शहरातील चार हाॅटेलचे (स्वीटमार्ट) रविवारी स्टिंग ऑपरेशन केले असता एकाही हाॅटेलमध्ये असे बाेर्ड आढळून आले नाही. खाद्यपदार्थांच्या प्रत्येक सीलबंद पाॅकेटवर निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, हे लिहिलेले राहते. मात्र, अनेक पदार्थ हाॅटेलमध्येच बनवून त्याच ठिकाणी विकले जातात. ते कधी बनविले व  किती दिवसांत ते वापरणे चांगले आहे, याबाबत ग्राहक अनभिज्ञ राहत हाेते. विशेषकरून यातील काही पदार्थ ओले राहत असल्याने ते लवकरच खराब हाेण्याची शक्यता राहते. दुकानदार मात्र मुदत संपली तरी ते पदार्थ विकत हाेते. यामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका असल्याने शासनाने पॅक न हाेणाऱ्या खाद्यपदार्थांबाबतही निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, याची तारीख असलेला बाेर्ड लिहिणे आवश्यक केले हाेते. याबाबतचा शासननिर्णय सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आला हाेता. त्यावेळी काही दिवस हाॅटेल व्यावसायिक असे बाेर्ड लावत हाेते. आता मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. लाेकमतने रविवारी चार स्वीटमार्टचे स्टिंग ऑपरेशन केले असता एकाही हाॅटेलमध्ये निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, याबाबतचे बाेर्ड लावले नसल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने हाॅटेलची तपासणी करण्याची गरज आहे.

बहुतांश स्वीटमार्ट चालकांचे दुर्लक्ष

मूलमार्ग मूलमार्गावरील एका हाॅटेलमध्ये स्टिंग ऑपरेशन केले असता त्या ठिकाणी मिठाईच्या ट्रेमध्ये बाेर्ड लावला हाेता. त्यावर मिठाईचे नाव व किंमत लिहिली हाेती. त्याच बाेर्डवर बेस्ट बीफाेर असे लिहिण्यात आले हाेते. मात्र, त्यावर काेणतीही तारीख टाकण्यात आली नव्हती. 

मास्कच्या बाबतीत आनंदीआनंद स्वीटमार्टमधील मालक व नाेकर यापैकी एकानेही मास्क घातला नव्हता. गडचिराेली शहरातील स्वीटमार्ट अतिशय लहान आहेत. त्यामुळे एकाचवेळी चार ते पाच ग्राहक आल्यास साेशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य हाेत नाही. अशातच ग्राहकही मास्क न घालताच हाॅटेलमध्ये आले असल्याचे दिसून आले. 

आरमाेरीमार्ग आरमाेरीमार्गावरील एका हाॅटेलमध्ये स्टिंग ऑपरेशन केले असता त्या ठिकाणी तर एकही बाेर्ड आढळून आला नाही. हे पदार्थ कधीपर्यंत खाऊ शकताे, याबाबत हाॅटेलमालकाला विचारणा केली असता पेढा व इतर गाेड पदार्थ फ्रीजमध्ये ठेवलेले राहत असल्याने अनेक दिवस ते खराब हाेत नसल्याचे सांगितले.

स्वच्छतेचे कायग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हाॅटेल व स्वीटमार्ट बाहेरून चकाचक बनविले आहेत. मात्र, ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनविले जातात, त्या ठिकाणी खरेच स्वच्छता पाळली जाते काय, हा प्रश्न आहे. त्या ठिकाणाची चाैकशी हाेणे आवश्यक आहे. 

कारवाई हाेत नसल्याने व्यावसायिक बिनधास्त अन्न व औषधी विभागाचे अधिकारी नेहमीच आपल्याकडे कमी प्रमाणात मनुष्यबळ आहे, असे तुणतुणे वाजवित राहतात. ते हाॅटेलची तपासणीच करीत नाही. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. कारवाई हाेत नसल्याने स्वीटमार्टचालक व हाॅटेल व्यावसायिक बिनधास्त असल्याचे दिसून येतात.  

 

टॅग्स :hotelहॉटेल