शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

रूग्णालय आजारी

By admin | Updated: July 27, 2014 00:07 IST

अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद

अहेरी उपजिल्हा : रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणामअहेरी : अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाची या रूग्णालयात वानवा आहे. यामुळे वेळेवर आरोग्य तपासणी होत नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. यामुळे हे रूग्णालय स्वत:च आजारी असल्याचे दिसून येते.अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील अतिदुर्गम भागातून अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होताना दिसते. या रूग्णालयात सध्या एक वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ व दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या रूग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञ, भाषक, पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, रेडिओलॉयजीस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिसेविका व दोन अधिपरिचारिका आदी पदे रिक्त आहेत. यामुळे रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कार्यरत डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी त्यांनाही तारेवरची कसरत करून रूग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे. या रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्यामुळे मलेरिया, सिकलसेल, हिमोग्लोबीन व इतर रक्ताच्या चाचण्या वेळेवर होत नाही. रूग्णांचे रक्त घेऊन ते परिश्रमासाठी गडचिरोलीला पाठविले जाते. या तपासणीचे रिपोर्ट येण्यासाठी ८ ते १० दिवसाचा कालावधी लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले असून या आजाराचे रूग्ण मोठ्या संख्या या रूग्णालयात दाखल होत आहेत. दाखल रूग्णांच्या रोगाचे निदान वेळेवर होत नसल्याने येथील रूग्णांची प्रकृती खालावत असल्याचेही दिसून येत आहे. या रूग्णालयातून ऐन वेळेवर रूग्णांना नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे हलविले जात आहे. दूरवरून आलेल्या गरीब रूग्णांकडे पैसे नसल्यामुळे त्यांची अशावेळी चांगलीच पंचाईत होत आहे. पूर्णवेळ बधीरीकरण तज्ज्ञ नसल्यामुळे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी बराच वेळ जात आहे. या रूग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिला रूग्णांचे हेळसांड होत आहे. रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.