शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

रुग्णालयातील जनरेटर नादुरूस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:47 IST

स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात मागील वर्षभरापासून जनरेटरची सुविधा नाही. या रुग्णालयातील जनरेटर वर्षभरापासून नादुरूस्त स्थितीत पडून आहे. १५ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देवर्षभरापासून जनरेटरची दुरुस्ती नाही : वीज पुरवठा खंडित झाल्यावर रूग्णांचे होतात हाल

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात मागील वर्षभरापासून जनरेटरची सुविधा नाही. या रुग्णालयातील जनरेटर वर्षभरापासून नादुरूस्त स्थितीत पडून आहे. १५ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जनरेटरसह अनेक समस्या या रूग्णालयात कायम आहेत.पावसाळा असल्याने रूग्णालय परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशा स्थितीत दिवसा व रात्री २४ तास पंखे सुरू असणे आवश्यक आहे. मात्र कुरखेडा येथील वीज पुरवठा अधूनमधून खंडीत होत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. येथील जनरेटर नादुरूस्त स्थितीत आहे. मात्र दुरूस्तीकडे रूग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रूग्णालयाच्या बऱ्याच वार्डातील शौचालय घाणीच्या विळख्यात सापडले आहे. काही शौचालय मागील वर्षभरापासून कुलूपबंद आहे. काही शौचालयाचे दार तुटलेले आहे. सदर रूग्णालयात औषधांचा नेहमीच तुटवडा जाणवत असतो. येथील काही अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याने रूग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही. या रूग्णालयाची आरोग्य सेवा प्रभावित झाली असूनही आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येथील समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी रूग्णांनी केली आहे. या रूग्णालयात तालुकाभरातून अनेक रूग्ण दररोज औषधोपचारासाठी येतात. काही रूग्ण भरती होतात. मात्र येथे डॉक्टर व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने सेवेवर परिणाम होत आहे.भोजन वाटपात विलंबरूग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाल्यावर विजेचे कारण सांगत रात्री १० ते ११ वाजेपर्यंत उशीरा रूग्णांना भोजनाचे वाटप केले जाते. जनरेटर कक्षाची दुरवस्था आहे. सदर कक्षाचे दार नेहमी बंदच असते. जनरेटर आज-उद्या दुरूस्त करू, असे सांगत अधिकाºयांकडून वेळ मारून नेली जात आहे. असुविधेमुळे रूग्ण त्रस्त आहेत.कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आपण रूजू झाल्यानंतर येथील विविध समस्या अवगत करून घेतल्या. येथील जनरेटर नादुरूस्त स्थितीत आहे. सदर जनरेटरची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आपण जिल्हा स्तरावरील अधिकाºयांकडे केली आहे. दुरूस्तीसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.- व्येंकटेश धवन,वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा

टॅग्स :hospitalहॉस्पिटल