शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करा

By admin | Updated: August 30, 2014 01:28 IST

जिल्ह्यातील खेड्यासह दुर्गम भागात बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तकांना अत्यल्प मानधन दिले जात आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील खेड्यासह दुर्गम भागात बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तकांना अत्यल्प मानधन दिले जात आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांवर वेठबिगारीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या वेतनात वाढ करून इतर समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी आयटकच्यावतीने खासदार अशोक नेते यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात आशा वर्करला १० हजार रूपये गटप्रवर्तकांना १५ हजार रूपये प्रतिमाह मानधन देण्यात यावे, अंगणवाडी सहाय्यक, आरोग्यसेविका या पदावर आशा वर्करला नियुक्ती द्यावी व वयोमर्यादेत शिथीलता द्यावी, आशा वर्कर कर्मचाऱ्यांना वर्षाला १७ हजार २०० रूपयांचा मेहनताना मिळावा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करावी, जननी सुरक्षा योजनेचा लाभ गरोदर मातांना देण्यात यावा, यात आशा कर्मचाऱ्यांनाही मोबदला द्यावा, आशांकडून अतिरिक्त काम मोबदल्याशिवाय करवून घेणे बंद करावे, गटप्रवर्तकांना शासकीय क व ड श्रेणीतील भरतीत प्राधान्य द्यावे व वयोमर्यादेत शिथीलता द्यावी, गटप्रवर्तकांच्या व्हीजीट भेटमध्ये १५० रूपये वाढ करून ६०० रूपये करण्यात यावे, रेकॉर्ड ठेवण्यासाठी आशांना कपाट द्यावे, आशा व गटप्रवर्तक महिलांना आरोग्य विमा योजना, जनश्री विमा योजनेचा मोफत लाभ द्यावा, आयसीडीएसप्रमाणे आशांना दरमहा मानधन द्यावे, सर्व आशांना वर्षातून दोन युनिफार्म व ओळखपत्र देण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आशा, गटप्रवर्तकांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करावी, दरमहा ३० रूपये मोबाईल बिल भत्ता देण्यात यावा, दिवाळी बोनस द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतांना जिल्हा संघटक विनोद झोडगे, देवराव चवळे, रजनी गेडाम, जयमाला सोरते, भाग्यश्री तिवाडे, प्रतीभा सोनुले, सरिता चुधरी, लक्ष्मी सिडाम उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)