शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:31 IST

भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात ....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव : शहीद पत्नी व शहीद माता उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना शौय पदक मिळाले त्याबद्दल राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा गडचिरोेली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नक्षल चकमकीत शहीद झालेले पोेलीस जवान दोगे डोेलू आत्राम यांच्या पत्नी दोगे व शहीद पोलीस शिपाई स्वरूप कुमार अशोक अमृतकर यांच्या आई कल्पना अमृतकर यांचा पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस निरीक्षक प्रफुल प्रभाकर कदम, सहायक पोलीस निरीक्षक विजय रमेशराव रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रंगनाथ भिंगारे, सहायक फौजदार मोतिराम बक्का मडावी यांना पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नक्षल व पोलीस यांच्या जंगलामध्ये झालेल्या चकमकीत उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या पोलीस जवानांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भीमराव काळे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन माने, पोलीस हवालदार मल्लेश केडकमवार, पोलीस नाईक जितेंद्र मारगाये, पोेलीस शिपाई गजेंद्र सौैंजाल यांचा समावेश आहे.गुणवंत विद्यार्थिनींचाही झाला गौरवसन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील स्काऊट-गाईड अंतर्गत ५ कब व १० बुलबुल यांना चतुर्थ चरण व हिरकपंख राज्यस्तरीय पुरस्काराने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये जि. प. हायस्कूलचा सिरोंचाचा विद्यार्थी बेनू मलय्या बुराम, आफताफ हकीम शेख, अअदनान एस. अमित शेख, मोहम्मदकाई डी.ए. कलाम शेख, समिरसाहेब हुसेन शेख व महात्मा गांधी नगर परिषद शाळा गडचिरोेलीची विद्यार्थिनी निर्जरा सुरेंद्र बन्सोड, स्नेहा शेषराव रंधये, प्रांजली किरण नैताम, रश्मी संजय मेश्राम, कीर्ति सुभाष जिगरबान, सानिया आनंद शेंडे, अंजली रेवाचंद बन्सोेड, जेवा आदिल शेख, स्वाती राजेश्वर मेश्राम, रहेमन आरिफ फेनोगे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.