शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बसवाहकाचा प्रामाणिकपणा : परत केले गडचिरोली-नागपूर बसमध्ये पडलेले ५० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 09:57 IST

सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सिरोंचा नागपूर या बसमधे पडलेले ५० हजार रुपयांचे बंडल बस वाहकाच्या प्रामाणिक व सचोटीने संबंधित व्यक्तीला परत मिळण्याची घटना आलापल्ली बसस्थानकावर घडली.

ठळक मुद्देप्रवाशाची वाट पाहत बस थांबवून ठेवली

आॅनलाईन लोकमतगडचिरोली-रस्त्यावर पडलेले पैसे उचलून संबंधित व्यक्तीला वा पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या अनेक घटना आपण वाचतो. मात्र कित्येकदा लोकांचे असे हरवलेले वा खाली पडलेले पैसे परत मिळतातच असे नाही. मग ती रक्कम ५० हजारांची असेल तर परत मिळण्याची शक्यताही कमीच असते. मात्र सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सिरोंचा नागपूर या बसमधे पडलेले ५० हजार रुपयांचे बंडल बस वाहकाच्या प्रामाणिक व सचोटीने संबंधित व्यक्तीला परत मिळण्याची घटना आलापल्ली बसस्थानकावर घडली.सोमवारी सकाळी सिरोंचाहून नागपूरकडे येणाऱ्यां बसमध्ये राकेश केशवराव अलोने हे प्रवास करीत होते. त्यांना चंद्रपूरपर्यंत जायचे होते. चंद्रपूरला जाण्यासाठी ते घाईने खाली उतरून गेल्यावर त्यांच्या सीटवर पडलेले ५० हजार रुपयांचे बंडल बसचे वाहक मनोज माणिकराव बाकडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ते ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राकेश अलोणे हे त्या जागेवर बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत अलोणे बसस्थानक सोडून निघून गेले होते. ते पैशासाठी निश्चित परत येतील असा कयास बांधून बसवाहक बाकडे यांनी बस आलापल्ली स्थानकावरच थांबवण्याचा निर्णय घेतला. तब्बल १५ ते २० मिनिटे त्यांनी प्रतिक्षा केल्यानंतर अलोणे हे परत बसस्थानकावर आले. त्यावेळी त्यांचे पैसे त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. आपले हरवलेले पैसे इतके व्यवस्थित व सुरक्षित ठेवल्याचे पाहून त्यांना आनंद व आश्चर्याचा धक्का बसला.