शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल मंजूर, मात्र निधीचा पत्ता नाही

By admin | Updated: December 27, 2014 01:41 IST

राजीव आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात १ हजार ७१६ घरकूल मंजूर करण्यात आले.

गडचिरोली : राजीव आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात १ हजार ७१६ घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र यासाठी आवश्यक असलेला निधीच शासनाने उपलब्ध करून दिला नसल्याने वर्ष लोटूनही घरकुलांचे काम थांबले आहे. गरीब नागरिकाला राहण्यासाठी निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी विविध योजनांतर्गत घरकूल बांधून दिले जाते. घरकूल बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षात शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी राजीव आवास योजनेंतर्गत १ हजार ७१६ घरकूल मंजूर केले. प्रशासनाने लाभार्थ्यांची यादी सुद्धा जाहीर केली. घरकुलाच्या यादीत नाव आल्याने लाभार्थ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. यासाठी आवश्यक असलेला निधी म्हाडा अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जातो. म्हाडाने घरकुलाचा निधीच वर्ष लोटूनही उपलब्ध करून दिला नाही. घरकूल यादीत नाव असल्याने लाभार्थी पंचायत समितीमध्ये जाऊन घरकुलाच्या निधीबाबत विचारणा करीत आहेत. मात्र निधीच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत अधिकारी व कर्मचारी हात वर करीत होते. दुसरीकडे त्याचवर्षी इंदिरा आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकूल मिळाले, त्यांना घरकूल बांधकामाचा निधी प्राप्त झाल्याने घरकुलाच्या कामाला सुरूवात झाली. मात्र राजीव आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे राजीव आवास योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. काही लाभार्थ्यांनी घरकूल मिळणारच या आशेवर जुने राहते घर पाडले. तर काहींनी शासनाकडून मिळणाऱ्या निधीला जोड करून मोठे घर बांधण्याच्या उद्देशाने सावकार व बँकेकडून कर्ज घेतले. मात्र शासनाचा निधी उपलब्ध न झाल्याने घर कसे बांधावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक व सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम भरून द्यावी लागत आहे. इंदिरा आवास योजनेचा निधी वेळेवर उपलब्ध झाला. मात्र राजीव आवास योजनेचा निधी मिळण्यास वर्ष लोटत चालला आहे. दोन्ही योजना शासनाच्याच असून लाभार्थी सुद्धा प्रतीक्षा यादीतूनच निवडण्यात आले आहेत. त्यामुळे एका योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणे व दुसऱ्या योजनेला वंचित ठेवणे हे अन्यायकारक असल्याची भावना घरकूल लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. योजनांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)