शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घर टॅक्स लावण्याचे काम ठप्प

By admin | Updated: June 3, 2017 01:16 IST

पुढील पाच वर्षाचे असेसमेंटचे (मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन) काम झाले नसल्याने मागील पाच महिन्यांपासून

वीज जोडणी घेण्यास अडचण : गडचिरोली नगर परिषदेकडून मूल्यांकनाला सुरूवातच नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुढील पाच वर्षाचे असेसमेंटचे (मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन) काम झाले नसल्याने मागील पाच महिन्यांपासून घर टॅक्स लावण्याचे काम पूर्णत: ठप्प पडले आहे. त्यामुळे नवीन घर बांधणाऱ्यांना वीज पुरवठा घेण्यासाठी तसेच इतर शासकीय कामांसाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. गडचिरोली शहरात जवळपास २० हजार घरे आहेत. या घरांवर नगर परिषद मालमत्ता कर आकारते. दरवर्षी नवीन बांधकाम होत असल्याने करामध्ये सुधारणा करणे आवश्यक राहते. दर पाच वर्षाने मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन केले जाते. त्यानुसार २०१७-१८ या वर्षात कराचे पुनर्मूल्यांकन करावे लागणार आहे. या मुल्यांकनादरम्यान ठरविलेले कराचे दर पुढील पाच वर्ष चालणार आहेत. नगर परिषदेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे सदर काम स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. यासाठी जवळपास ३० ते ४० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. २०१७-१८ च्या कराचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्याने त्याची पूर्व तयारी नगर परिषदेने अगोदर करणे आवश्यक होते. मात्र मे महिना उलटला तरी असेसमेंट तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक प्रक्रिया सुध्दा नगर परिषदेने पार पाडली नाही. सर्व प्रथम निविदा काढून स्वयंसेवी संस्थेची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद नगर परिषदेला करावी लागणार आहे. खर्चाची तरतूद केली आहे. मात्र अजूनपर्यंत निविदा काढून संस्थेची निवड केली नाही. नवीन घरांना घर टॅक्स पावती देण्याचे काम एप्रिल ते डिसेंबर या कालावधीपर्यंत केले जाते. याचाच अर्थ २०१७ मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत बांधलेल्या घरांना घर टॅक्स देण्यात आला नाही. घर टॅक्स लावण्याच्या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्न प्राप्त होते. मात्र या उत्पन्नापासूनही नगर परिषदेला वंचित राहावे लागत आहे. नवीन घराला वीज जोडणी देण्यासाठी महावितरण घराचा पुरवा म्हणून घर टॅक्स पावती मागते. मात्र घर टॅक्स पावती नसल्याने वीज जोडणी सुध्दा थांबली आहे. यामुळे नवीन घर बांधणारे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर विविध दाखल्यांसाठी घर टॅक्स पावती आवश्यक राहते. नगर परिषद तसेच आपल्या वार्डाच्या नगरसेवकांना याबाबत वेळोवेळी विचारणा करीत आहे. मात्र असेसमेंट करण्याविषयी नगर परिषदेने अजूनपर्यंत तयारी सुद्धा केली नसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेच्या या लेटलतीफ कारभाराचा फटका गडचिरोली शहरातील नागरिकांना बसत आहे.