शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

गुगल मॅपवर मिळेल घरांचे लोकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:28 IST

गडचिरोली व देसाईगंज शहरातील मालमत्तेचे जीआयएस (जीओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) द्वारे सर्वे केला जात आहे. सदर सर्वे कर पुनरआकारणीसाठी असला तरी या सर्वेतून गोळा झालेला डेटा गुगल मॅपवर टाकला जाणार आहे.

ठळक मुद्देमालमत्ता कराचे फेरमूल्यांकन सुरू : गडचिरोली व देसाईगंज शहरांचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व देसाईगंज शहरातील मालमत्तेचे जीआयएस (जीओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) द्वारे सर्वे केला जात आहे. सदर सर्वे कर पुनरआकारणीसाठी असला तरी या सर्वेतून गोळा झालेला डेटा गुगल मॅपवर टाकला जाणार आहे. प्रत्येक घराची स्वतंत्र आयडेंटिटी बनविली जात असल्याने गुगल मॅपवर घराचे नाव टाकल्याबरोबर संबंधित घराचे लोकेशन उपलब्ध होणार आहे.नगर परिषद हद्दीतील मालमत्तेची दर चार वर्षांनी फेर करनिर्धारण केले जाते. यापूर्वी नगर परिषदेचे कर्मचारी प्रत्येक घराचे साध्या मोजपट्टीने मोजमाप करून करनिर्धारण करीत होते. बऱ्याचवेळा मालमत्ताधारक संबंधित कर्मचाऱ्याला शे-दोनशे रूपये देऊन घराचा आकार कमी नोंदवायला सांगत होते. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकाचा कर वाचत असला तरी नगर परिषदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वे करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या महाआयटी विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील नगर परिषदांमधील मालमत्तेच्या सर्वेला सुरूवात झाली आहे. सर्वे करण्याचे काम एस-२ इन्फोटेक कंपनीला देण्यात आले असून या कंपनीने गडचिरोली शहरात २१ तर देसाईगंज शहरात १५ कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, परवानगीपत्र देण्यात आले आहे. सदर कर्मचारी मागील पाच दिवसांपासून प्रत्येक घरी जाऊन घराचा सर्वे करीत आहेत. सर्वे करते वेळी संबंधित घराचा अ‍ॅड्राईड मोबाईलच्या सहाय्याने समोरून व दोन्ही बाजूने फोटो काढला जात आहे. त्याचबरोबर डिस्टोमीटर मशीनच्या सहाय्याने घराचे मोजमाप केले जात आहे. डिस्टोमीटर मशीनमध्ये लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असल्याने घराचे तंतोतंत मोजमाप होणार आहे. कच्चा घर, पक्का घर, पूर्ण पक्का घर, टिनाचा शेड अशा चार भागांमध्ये घरांचे वर्गीकरण करण्यात येत आहे. घराचा आकार व प्रकार यावरून करनिर्धारण केले जाणार आहे. जे घर बंद स्थितीत आढळले त्या घराला नोटीस चिकटविले जात आहे. सध्यास्थितीत फुले वॉर्डापासून सुरूवात झाली आहे. बाहेरून घराचे मोजमाप करण्याबरोबरच घरातील प्रत्येक खोलीचीही पाहणी केली जात आहे. त्यामुळे संबंधित घरात नेमक्या किती खोल्या आहेत. तळमजला आहे काय, घर दुमजली आहे काय हे कळण्यास मदत होणार आहे.गोळा केलेली माहिती नगर परिषदेकडे आॅनलाईन उपलब्ध राहणार आहे. त्याचबरोबर करनिर्धारणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संंबंधित घराचे लोकेशन गुगल मॅपवर टाकले जाणार आहे. त्यामुळे शहरात एखाद्याचे घर शोधायचे असल्यास यापुढे कुणाला विचारण्याची गरज पडणार नाही. गुगल मॅपच आपल्याला संबंधित घराचे लोकेशन उपलब्ध करून देणार आहे. सध्यास्थितीत गुगल मॅपवर काही निवडक लोकांच्या घराबाबतचीच माहिती आहे. घरांचे चित्र सॅटेलाईटच्या माध्यमातून काढले असल्याने घरांचा फक्त वरच भाग दिसतो. त्याचबरोबर शहरातील रस्ते स्पष्ट दिसतात. मात्र घराचे चित्र स्पष्ट दिसत नाही. यानंतर संबंधित घराच्या तीन बाजूचे चित्र टाकले जाणार असल्याने सदर घर ओळखण्यासही मदत होणार आहे. यामुळे शहरातील प्रत्येक घर आता गुगल मॅपच्या नकाशावर दिसणार आहे.सध्यास्थितीत नगर परिषद अंतर्गत सर्वे सुरू आहे. यानंतर नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या शहरांचा सर्वे केला जाणार आहे. सध्याच्या सर्वेवरून नगर रचना व करनिर्धारण विभाग कर ठरविणार आहे. कराबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित नागरिकाला सर्वप्रथम कर रचना विभागाकडे सुनावणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अंतिम सुनावणी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून केली जाणार आहे. या समितीने दिलेला निर्णय अंतिम राहणार आहे.सर्वे सक्तीचाकाही नागरिक घराचा सर्वे करू देण्यास टाळाटाळ करीत आहेत. जे नागरिक सर्वे करू देण्यास नकार देत आहेत. तशी नोंद सर्वे करणारे कर्मचारी करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पोलिसांची मदत घेऊन सर्वे केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सर्वेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोलीचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांंनी केले आहे.या बाबींची केली जात आहे पाहणीसर्वे करणारे कर्मचारी, खोल्यांची संख्या, स्वयंपाक घरांची संख्या, स्वच्छतागृहांची संख्या, स्नान गृहांची संख्या, नळ जोडणी, सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ड्रेन सेप्टी टँक, जाहिरात, मोबाईल टॉवर, वीज जोडणी आदी बाबतची पाहणी केली जाणार आहे.प्रत्येक घराची युनिक आयडी बनविली जाणार आहे. यामध्ये संबंधित घराला विशिष्ट क्रमांक दिला जाईल. त्याचबरोबर इमारतीचे नाव, जवळचा मार्ग, जवळचे एखादे महत्त्वाचे ठिकाणसुद्धा नमूद केले जाणार आहे. हीच माहिती पुढे गुगल मॅपवर टाकली जाणार आहे.यापूर्वी घर बांधणीच्या परवानगीसाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता मात्र घराच्या परवानगीचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.