शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजारांवर घरकूल अपूर्ण

By admin | Updated: September 1, 2016 01:37 IST

राज्य शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले.

उदासीनता : जुने घरकूल रखडलेले, नव्याची अंमलबजावणी ठप्पगडचिरोली : राज्य शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी ३० आॅगस्टपर्यंत केवळ ४२९ घरकूल पूर्ण झाले असून तब्बल ३ हजार ९५१ घरकूल अपूर्ण स्थितीत आहेत. तसेच सन २०१६-१७ वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ५ हजार ३३२ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत एकाही घरकुलाचे काम सुरू झाले नाही. एकूणच जुने घरकूल रखडले असून नव्या योजनेतील घरकूल बांधकामाची अंमलबजावणी थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. दारिद्र्य रेषेखालील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना हाती घेतली. या योजनेंतर्गत राज्यभरात घरकूल बांधकामाचे जिल्हास्तरावरील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला उद्दिष्टही दिले. मात्र वेळेवर बांधकाम साहित्य उपलब्ध न होणे, तसेच लाभार्थ्यांची उदासीनता या कारणामुळे गडचिरोली जिल्ह्यात घरकूल बांधकामाची गती प्रचंड मंद आहे. सन २०१५-१६ या वर्षात इंदिरा आवास योजनेंतर्गत अहेरी तालुक्यात १ हजार ९३ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैैकी एकाही घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले नसून ९७१ घरकूल अपूर्णावस्थेत आहेत. आरमोरी तालुक्यात २११ मंजूर घरकुलांपैकी ४७ घरकुलाचे पूर्ण झाले असून १५५ घरकूल अपूर्ण आहेत. भामरागड तालुक्यात १५१ घरकुलांपैकी १० घरकूल पूर्ण झाले असून ९० घरकूल अपूर्णावस्थेत आहेत.चामोर्शी तालुक्यात ७७८ मंजूर घरकुलांपैकी ९४ घरकूल पूर्ण झाले असून ५८० घरकूल अपूर्णावस्थेत आहेत. देसाईगंज तालुक्यात ७६ घरकुलांपैकी १८ घरकूल पूर्ण झाले असून ५५ घरकूल अपूर्णावस्थेत आहे. धानोरा तालुक्यात ४२३ घरकुलांपैकी केवळ ८ घरकूल पूर्ण झाले असून ४०१ घरकुलांचे काम अपूर्णावस्थेत आहे. एटापल्ली तालुक्यात १५२ घरकुलांपैकी १४१ घरकूल अपूर्ण आहेत. गडचिरोली तालुक्यात ७०३ घरकुलांपैकी २०० घरकूल पूर्ण झाले असून ४५१ घरकूल अपूर्ण आहेत. कोरची तालुक्यात २७३ घरकुलांपैकी केवळ ४ घरकूल पूर्ण झाले असून २६५ घरकूल अपूर्णस्थितीत आहेत. कुरखेडा तालुक्यात ४४० घरकुलांपैकी ५० घरकूल पूर्ण झाले असून ३५७ घरकूल अपूर्ण आहेत. मुलचेरा तालुक्यात २९० घरकुलांपैकी केवळ ३ घरकूल पूर्ण झाले असून २७२ घरकूल अपूर्ण आहेत. सिरोंचा तालुक्यात २७८ घरकुलांपैकी केवळ ५ घरकूल पूर्ण झाले असून २७३ घरकुलांचे काम अपूर्णस्थितीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)अहेरी तालुका पिछाडीवरअहेरी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सन २०१५-१६ यावर्षात इंदिरा आवास योजनेंतर्गत एकूण १ हजार ९३ घरकूल मंजूर करण्यात आले. या तालुक्यात एकाही घरकुलाचे काम ३० आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. तब्बल ९७१ घरकुलाचे काम अपूर्णस्थितीत आहेत. घरकूल बांधकामात अहेरी तालुका सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे दिसून येते.४७८ घरकुलांचा प्रारंभच नाहीगडचिरोली जिल्ह्याच्या १२ ही तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ४ हजार ८६८ घरकुलांपैकी ४७८ घरकुलांच्या कामांना वर्ष उलटूनही सुरुवात झाली नाही. यामध्ये अहेरी तालुक्यातील १२२, आरमोरी तालुक्यातील ९, भामरागड तालुक्यातील ५१, चामोर्शी तालुक्यातील १०४, देसाईगंज तालुक्यातील ३, धानोरा तालुक्यातील १४, एटापल्ली तालुक्यातील ११, गडचिरोली ५२, कोरची ४, कुरखेडा ३३ व मुलचेरा तालुक्यातील ७५ घरकुलांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने वारंवार संबंधित लाभार्थ्यांना सूचना देऊनही काम हाती घेण्यात आले नाही.