शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:57 IST

गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात.

ठळक मुद्देयंदा प्रचंड घट येणार : तूर, तीळ, पोपटसह व इतर पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वदूर भागात गेल्या २० ते २५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसून तसेच सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून तुरीची झाडे कुजत आहेत. त्यामुळे तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका, तूर, तीळ, पोपट, वाल, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांना बसला आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात. अलिकडे आंतरपिकासह अनेक शेतकरी संपूर्ण शेतात तुरीचे पीक घ्यायला लागले आहे. काही शेतकरी संर्पूण वावरी शेतजमिनीत सोयाबीनची पेरणी करतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात तूर व सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र संततधार पावसामुळे हे पीक धोक्यात आले आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. त्यानंतर आता संततधा पावसामुळे कडधान्य पिकाची नासाडी होत आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काठालगतच्या शेतजमिनीतील सोयाबीन, तुरी व इतर कडधान्याचे पीक नष्ट झाले. २५ जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सतत पाऊस येत असल्याने शेताच्या सखल भागातील तुरी पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. तर काही शेतातील पीक मुसळधार पावसामुळे वाकले असून त्यांचीही स्थिती बिकट आहे.दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात तुरीचे पीक शेवग्यावर येते. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी चिंतेत आहे. ज्या शेतकºयांनी तुरीचा पीक विमा काढला, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे. सोयाबीन, कापूस पिकाचीही स्थिती अतिपावसामुळे चिंताजनक आहे.शेतकºयांचे बजेट कोलमडणारधानपिकासोबत विविध प्रकारच्या कडधान्याचे उत्पादन घेऊन शेतकरी ही प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोन्ही प्रकारचे पीके घेतले तर त्याला चांगला आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा अतिवृष्टी धान या मुख्य पिकासह तूर, तीळ, पोपट, वाल या कडधान्य पिकासह सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांचे आर्थिक बजेट यावर्षी कोलमडणार आहे. आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती