शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सर्वाधिक पाऊस भामरागडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:07 IST

यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान भामरागड तालुक्यात झाले आहे. आजपर्यंत भामरागड तालुक्यात १३०६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात १३०६.४ मिमी : सर्वात कमी पर्जन्यमान सिरोंचा तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान भामरागड तालुक्यात झाले आहे. आजपर्यंत भामरागड तालुक्यात १३०६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५ आॅगस्टपर्यंत भामरागड तालुक्यात १०० टक्के पाऊस बरसरला. जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी, नाले, तलाव, बोड्यांमध्ये जलसाठा वाढला आहे. मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी आतापर्यंत तीन वेळा संपर्क तुटला आहे.१ जूनपासून आतापर्यंत अहेरी तालुक्यात सरासरी ९०१ मिमी पाऊस बरसला असून पर्जन्यमानात अहेरी तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पर्जन्यमानाच्या आकडेवारी मुलचेरा व एटापल्ली तालुक्याचा क्रमांक लागतो. मुलचेरा तालुक्यात ८९० मिमी व एटापल्ली तालुक्यात ८५३ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ६०६ मिमी पाऊस झाला आहे.संततधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक घरांची अंशत: व काही घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. प्रशासनाच्या वतीने पडझड झालेल्या घर व जनावरांच्या गोठ्यांचे पंचनामे केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही. वैरागडजवळून वाहणाºया वैलोचना नदीलाही दोनदा पूर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने धानपीक रोवणीचे काम काही भागात थांबले आहे. कारण बºयाच ठिकाणच्या शेतजमिनी पूर्णत: पाण्याखाली आल्या आहेत. एकूणच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.१ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊसतालुका पाऊस (मिमी)भामरागड १३०६.४अहेरी ९०१.०मुलचेरा ८९०.२एटापल्ली ८५३.०धानोरा ८१०.९कुरखेडा ७९७.०आरमोरी ७९३.६कोरची ७२८.०गडचिरोली ७२६.१देसाईगंज ७२२.४चामोर्शी ६८८.९सिरोंचा ६०६.०सरासरी ८१८.६