शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

चालू आठवड्यात कोरोना रूग्णांचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

१८ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्याच आठवड्यात रूग्णांची संख्या तीन वर पोहोचली. दुसऱ्या आठवड्यात १० रूग्ण आढळून आले. नवव्या आठवड्यार्यंत दर आठवड्याला दोन अंकी संख्येत रूग्ण आढळून येत होते. मात्र दहाव्या आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात १०० पेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. यामध्ये केवळ १५ वा आठवडा अपवाद ठरला. या आठवड्यात केवळ ६० रूग्ण आढळून येत आहेत.

ठळक मुद्दे१८ मे ला आढळला पहिला रूग्ण : सात दिवसात ३१९ रूग्णांची भर; नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आंतरजिल्हा प्रवासावरील बंधने उठविल्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या आठवड्यात सुमारे ३१९ रूग्ण आढळून आले. यापूर्वीच्या आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात सर्वाधिक रूग्ण वाढले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.१८ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्याच आठवड्यात रूग्णांची संख्या तीन वर पोहोचली. दुसऱ्या आठवड्यात १० रूग्ण आढळून आले. नवव्या आठवड्यार्यंत दर आठवड्याला दोन अंकी संख्येत रूग्ण आढळून येत होते. मात्र दहाव्या आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात १०० पेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. यामध्ये केवळ १५ वा आठवडा अपवाद ठरला. या आठवड्यात केवळ ६० रूग्ण आढळून येत आहेत. १६ व्या आठवड्यात २११ रूग्णांची भर पडली होती. १७ व्या आठवड्यात १७४ रूग्ण वाढले. तर १८ व्या म्हणजेच शनिवार ते रविवारच्या आठवड्यात सुमारे ३१९ रूग्ण आढळून आले आहेत. रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.२ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. प्रत्येक सीमेवर पोलीस चौकी लावण्यात आली होती. त्यामुळे दुसºया जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीची नोंद घेऊन त्याला क्वॉरंटाईन केले जात होते. तसेच ई-पास असल्याशिवाय जिल्हाबाहेर जाता येत नव्हते. २ सप्टेंबरपासून शासनाने आंतरजिल्हा प्रवासावरील बंधने हटविली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक नागपूर, चंद्रपूर, तेलंगणा राज्यातील हैदराबाद व इतर मोठ्या शहरांमध्ये जाऊन येत आहेत. दुसºया राज्यातील मजूरही काम करण्यासाठी येत आहेत. आता कोणावरच नियंत्रण राहले नाही. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढत आहे.आंतरजिल्हा प्रवासाची बंधने हटविल्यानंतर त्याच आठवड्यात सुमारे २११ रूग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यानंतरच्या आठवड्यात १७४ रूग्ण आढळले. तर नुकताच संपलेल्या आठवड्यात ३१९ रूग्ण आढळून आले आहेत.जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्हजिल्हाधिकारी दीपक सिंगला हे वैयक्तिक कारणासाठी १० दिवसांच्या रजेवर गेले होते. ते शनिवारी जिल्ह्यात दाखल झाले. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता, ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकारी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपचरादरम्यान ते प्रशासकीय कामे आॅनलाईन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना सध्या कोणतीही लक्षणे नाहीत. कुटुंबातील इतर सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.रविवारी 41 रूग्णांची भररविवारी ४१ कोरोना रूग्णांची भर पडली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २२ जणांचा मसावेश आहे. यात गोकुलनगरातील १७ जण, चामोर्शी मार्गावरील दोघे, चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड येथील एक जण, कार्मेल शाळेच्या मागील एक जण व साईनगरातील एका जणाचा समावेश आहे. एटापल्ली येथील कोविड सेंटरमधील दोघे जण, सिरोंचा येथील एक नागरिक, देसाईगंज येथील सहा जण यामध्ये एक सीआरपीएफ, कोंढाळा येथील तिघे जण, देसाईगंज शहरातील हनुमान वार्डातील एक जण, कमलानगरातील एक जण, जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेला चामोर्शी येथील एक जण, आरमोरी येथील दोन प्रवाशांचा समावेश आहे. अहेरी येथील सात जण, यामध्ये बाधिताच्या संपर्कातील एक जण, सी-६० पोलीस व त्याच्या कुटुंबियातील तिघे जण, मंचेरीयलवरून आलेले तीन प्रवाशी, तेलंगणातून आलेले दोघे जण यांचा समावेश आहे.कारवाईचा मुहूर्त सापडलाच नाहीगडचिरोली शहरासह चामोर्शी आणि इतर काही भागात कोरोना रूग्णांची संख्या आता वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र तरीही कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन बहुतांश ठिकाणी होताना दिसत नाही. असे असताना शनिवारीही गडचिरोली शहरात नियम मोडणाºयांवर कारवाई करण्याचा मुहूर्त तालुका प्रशासनाला सापडला नसल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या